उदगीर : येथील कृष्णकांत चौकातील एक दुकान मंगळवारच्या पहाटे फोडून चोरट्यांनी ७ लाखांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़उदगीरच्या देगलूर रोडवरील कृष्णकांत चौकात निशांत सुधाकर मुस्कावाड यांचे स्पेअर पार्ट्सचे दुकान आहे़ सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले़ दरम्यान, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडून आतील जेसीबीचे लोखंडी साहित्य व स्पेअर पार्ट्स पळवून नेले आहेत़ या घटनेत एकूण ७ लाख १३ हजार १२१ रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे़ याप्रकरणी मंगळवारी निशांत मुस्कावाड यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली़ त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़
दुकान फोडून सात लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST