शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

दुकान फोडून ६ लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: August 7, 2014 01:15 IST

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले.

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.जालना येथील रहिवासी सराफा व्यापारी राजेश बाबूराव लोळगे यांची शेलगावात लोळगे ज्वेलर्स ही सोन्याचांदीचे दुकान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लोळगे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्याचांदीचे दागिने असा वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला.लोळगे हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले. दुकान उघडल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त झालेले पाहून दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. त्यावर पोलिस निरीक्षक पंकज जाधव, फौजदार राजपूत, कॉ. शिवनकर आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच जालना येथून श्वानपथकासही पाचरण करण्यात आले. श्वानाने जालना मार्गावर गावाच्या मुख्यरस्त्याच्या कमानीपर्यंत माग काठून तेथेच घुटमळले. चारीच्या या घटनेमुळे शेलगाव ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.(वार्ताहर)जिल्ह्यात बुधवारी रात्री शेलगावच्या सराफा दुकानासह चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. जालना शहरातील गांधीनगरातील संतोष घुले यांच्या घरी झालेल्या चोरीत ११ हजाराचे संसार उपयोगी साहित्य चोरून नेले. कुंभारपिंपळगाव ता घनसावंगी येथील बीएसएलच्या टावरवरील ५४ हजार रूपये किमतीच्या ६ बॅटऱ्या चोरून नेल्या, तर धावडा ता. भोकरदन येथील राजू देशमुख यांच्या टेम्पोचे २२ हजार रूपये किमतीचे टायर चोरट्यांनी चोरून नेले.४मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. काही दिवसापूर्वीच जालना- औरंगाबाद ग्रामीण बँक फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. बँकेच्या तीन कुलूपे तोडल्यानंतर सायरनचा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. तसेच गावातील बैल, विहिरीवरील मोटारींच्या चोरीच्या घटनाही झालेल्या आहेत. गावात पोलिस चौकी स्थापन करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.