शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी रुग्णालयाकडे मागितले चार लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:39 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देजालन्यात व्हिडिओ व्हायरल तीन कंत्राटी अधिकारी निलंबित 

जालना : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्याकडे चार लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच तिन्ही कंत्राटी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

यासंदर्भात आम आदमी पार्टीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कंत्राटी म्हणून कार्यरत असलेले जिल्हा समन्वयक गुरूराज थट्टेकर, जिल्हा प्रमुख अमित दरक आणि आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आपारे यांनी एका रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी चार लाख रुपयांची मागणी केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना ही माहिती कळविली. शिंदे यांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तिन्ही अधिकाऱ्यांना काम थांबविण्याचे निर्देश दिले असून, त्यांच्यावर निलंबनासह चौकशी अंती आणखी गंभीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. आम आदमी पार्टीचे मराठवाडा विभागीय सचिव अनिल ढवळे, अ‍ॅड. योगेश गुल्लापेल्ली, संजोग हिवाळे, मुकुल निकाळजे, बळीराम कोलते, रविकुमार सूर्यवंशी आदींनी ही तक्रार दिली होती.

अधिकारी आणि डॉक्टर यांच्यातील व्हायरल झालेला संवाद...डॉक्टर : तुम्ही पहिले काय म्हटले की, आम्ही आॅडिट करणार नाही. डायरेक्ट वर्षभरानेच इन पॅनल करून देतो. तुम्ही अशी टर्म चेंज करायला लागले सगळी.अधिकारी : सर, तुमचा काय विषय झाला मला सांगितलं त्यांनी.डॉक्टर : ते म्हटले ना की एक वर्षाने अ‍ॅडिट होईल तुमचे. दुसरा अधिकारी : दोन- तीन महिन्यांनी होईल, असे म्हटलो होतो.डॉक्टर : मग पैसे द्यायचा काय संबंध? मग चार लाख रूपये?पहिला अधिकारी : कन्डीशन्स बदलत राहतात. हे तुम्ही मान्य करतात की नाही करता?डॉक्टर : नाही, पण ते आता म्हणतात आॅडिट होऊ शकत नाही. कसे करणार मग? अधिकारी : एकदम बरोबर आहे सर.डॉक्टर : तुम्ही आता चार लाख रूपये घेतले ना? मग काय केलं आतापर्यंत?पहिला अधिकारी : सर, इकडे बघा आम्ही तुम्हाला प्रिप्रेशन करून देतो.डॉक्टर : आहो, मीच करतोय प्रिप्रेशन. तुमचा काय त्याच्यामध्ये संबंध आला? तुम्हाला मला आॅडिटला मदत करणे आहे. चार लाख रूपये घेऊन तुम्ही काय केलं? तुम्हीच बोलता आणि परत शब्द बदलता.अधिकारी : असे आम्ही कुठेच काही केले नाही.डॉक्टर : तुम्ही काय सांगितले? सर, तुम्ही मला चार लाख रूपये द्या. मी तुमचे इनपॅनल आणून देतो. तुमचे एक वर्षाने आॅडिट होईल. म्हटले की नाही?दुसरा अधिकारी : सर, आॅडिट होत नाहीत काही हॉस्पिटलचे. त्यांना डायरेक्ट इनपॅनल पण भेटतं, असे बोललो आम्ही. डॉक्टर : अहो, तुम्ही म्हटले ना. ठीक आहे ना तुम्हाला इनपॅनल करून द्यायचय ना,तुम्ही एवढे एवढे पैसे द्या. मग मी तुम्हाला कशाला पैसे दिले असते. मला सगळंच करायचे मग कशाला तुम्हाला पैसे देऊ ? अधिकारी : सर, एक मिनिट.डॉक्टर : असे नाही, तुम्हाला मला आॅडिटला सगळ्याच मशिनरी दाखविणे आहे. तुम्ही जर नसेल करत तर इथे ब्रेक करा. अधिकारी : ठिक आहे ना सर.डॉक्टर : कारण तुम्ही म्हणाल मी सीआर्म दाखविणार नाही. मी हे करणार नाही. 

टॅग्स :JalanaजालनाMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर