शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

धक्कादायक ! अपत्य होत नसल्याने दाम्पत्यात वाद; नैराश्यातून दोघांनीही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:37 IST

दोघे पती, पत्नी आपल्या छोट्या संसारात बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा करू लागले; पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नव्हते़  बाळ होत नसल्याने पती, पत्नीत वाद झाला.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यातील देगाव येथील घटनावादामुळे उचलले टोकाचे पाऊल

मुक्रमाबाद  (जि़ नांदेड) : लग्नानंतर सुखी संसाराला सुरुवात झाली खरी, मात्र त्यानंतर मुल होत नसल्याने पती, पत्नीत वाद निर्माण झाले. त्यातच कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये पतीचे काम बंद झाले़ त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकून गावी परतलेल्या पती, पत्नीतील वाद विकोपाला गेला़ अखेर जगण्यावरचे प्रेम नाकारून दोघांनीही  गळफास घेऊन मृत्यूला जवळ केले़ ही घटना मुखेड तालुक्यातील देगाव येथे मंगळवारी घडली़  

मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या देगाव येथे लक्ष्मण विठ्ठल पुल्लेवाड (२५), अनुसया लक्ष्मण पुल्लेवाड (२४ ) यांचे तीन वर्षापूर्वी थाटामाटात लग्न झाले. गावाकडे काम नसल्याने नवदाम्पत्याने पोटासाठी मुंबईची वाट धरली़  मुंबईत हाताला मिळेल ते काम करून लक्ष्मण व अनुसया दोघेही सुखाने राहू लागले़  दोघे पती, पत्नी आपल्या छोट्या संसारात बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा करू लागले; पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नव्हते़  बाळ होत नसल्याने पती, पत्नीत वाद झाला. प्रेमाच्या भरतीला ओहोटी लागली.  

वादामुळे उचलले टोकाचे पाऊलबाळ होण्यासाठी पती, पत्नी दवाखान्याच्या पायऱ्या चढू लागले़ मात्र, अनेक ठिकाणी उपचार करूनही यश येत नव्हते़ त्यामुळे बाळाचे स्वप्न पूर्ण होईल का नाही, अशी भीती दोघांनाही वाटू लागली़ त्यातच कोरोना महामारीचे संकट उभे राहिले़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली़ मुंबईतील अनेकांचा रोजगार बंद झाला़ हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ सुरू झाली़ लक्ष्मण पुल्लेवाड यांच्या हाताचे कामही निघून गेले़ त्यामुळे मुखेड तालुक्यातील आपल्या मूळ गावी देगावला हे दोघेही  परतले़ गावात काही दिवस राहिल्यानंतर परत त्यांच्यात विविध कारणावरून वाद  होऊ लागले़  आपल्याला मूल होत नाही. आपले वादविवाद आयुष्यभर असेच चालू राहणार, यामुळे आयुष्य संपवलेलेच बरे होईल. असे ठरवून दोघांनीही मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़