शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणलाच ‘शॉक’

By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST

बीड : शहरातील नागरिकांकडे वीजेची थकबाकी कोटीच्या घरात आहे. वसुली करता-करता महावितरणच्या नाकीनऊ येत आहे तर दुसऱ्या बाजूला सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी

बीड : शहरातील नागरिकांकडे वीजेची थकबाकी कोटीच्या घरात आहे. वसुली करता-करता महावितरणच्या नाकीनऊ येत आहे तर दुसऱ्या बाजूला सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी होत असल्याचा गैरप्र्रकार ‘लोकमत’ने समोर आणला आहे. आकडे टाकून वीज चोरणे हा प्रकार नवा नसला तरी हा प्रकार थांबलेला नाही हे दाखविण्यासाठी हा केलेला प्रामाणिक प्रयत्न. शहरी व ग्रामीण भागात ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशन करून विजेची होणारी चोरी चव्हाट्यावर आणली आहे. शहराला महिन्याकाठी १२ मेगा युनिटची वीजेची आवश्यकता असते. यामधील ७.१० मेगा युनिट विजेचा वापर प्रत्यक्ष ग्राहकांसाठी केला जातो. यामधून महिन्याकाठी महावितरणला ४ कोटी ३१ लाख रुपये पदरी पडतात. मात्र महिन्याकाठी ४.९ मेगा युनिटचा तोटा महावितरणला सहन करावा लागत आहे. उवरित जवळपास ५ मेगा युनिटची विजेची चोरी, गळती व तांत्रिक बिघाडमुळे हा तोटा होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच अवस्था महावितरणची झाली आहे. बीड शहराची वसूली कोटीच्या घरात आहे. वसुलीकरिता महावितरण कडून प्रयत्न केले जात आहेत. ग्राहकांची वीज बील अदा करण्याची मानसिकता नसल्याने दिवसेंदिवस थकबाकीत वाढच होत आहे. तर दुसरी शहरातील काही भागात वीज बील भरण्याच्या भानगडीत न पडण्याचा फंडा ग्राहकांना अवलंबला आहे. शहरात व ग्रामीण भागात आजही दिवसाढवळ्या आकडी टाकून विजेची चोरी केली जात आहे. शहरातील थकबाकी लक्षात घेता महावितरणला ५ कोटी ६६ लाखाचे उद्दीष्ट दिले गेले आहे. त्यापैकी महिन्याकाठी सरासरी ३ कोटी ७७ लाखाची वसूली होत आहे. म्हणजेच महिन्याला २ कोटीचा फटका महावितरणला सहन करावा लागत आहे. यामध्ये आकडे टाकून वीज चोरी केल्यानेही महावितरणला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ढाबे, हॉटेल्स आकड्यावरचशहरालगतचे बार्शी नाक्यावरील हॉटेल्स, ढाब्यावर कोणत्याही प्रकारचे मीटर लावण्यात आले नव्हते. भरचौकातील लहान-मोठ्या हॉटेलधारकांनी आकड्याच्या सहाय्यानेच वीज घेतली असल्याचे निदर्शनास आले. शहरातील दुर्गम भागातच अधिक वीजचोरी केली जात आहे. या भागात वायरमनही ढुंकूनही पाहत नसल्याने या परिसरात खुलेआम आकडी टाकली जात आहे.(प्रतिनिधी)