शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा १०० कोटींचा शॉक

By admin | Updated: June 21, 2017 00:09 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे. वीज चोरीला आळा घालणे आणि थकबाकी वसूल करण्याचे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले.अचूक मीटर रीडिंग घेऊन एजन्सीज् वेळेत वीज ग्राहकांना बिले देत नसतील तर रीडिंग घेण्याचे काम आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जालना जिल्ह्यातील १०८ गावांमध्ये कायमस्वरुपी तसेच ३३ वीज वाहिन्यांवरील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांचे प्रमाणदेखील ६०-७० टक्के असून, चालू वीजपुरवठा असलेले फक्त ३०-४० टक्के च ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा न केल्यास वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा त्यांनी दिला. जळगाव परिमंडळातील धुळे मंडळात १९ टक्के व जळगाव मंडळामध्ये २४ टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात २७ टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे. त्यामुळे धुळे मंडळात दरमहा १४ कोटी, नंदुरबार जिल्ह्यात ३६ कोटी, तर धुळे मंडळात साडेबारा कोटी रुपये, असे एकूण ६२ कोटी ४ लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत महसुली तुटीमुळे पायाभूत सुविधांची कामे करणे कठीण होत असून, त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत आहे. बैठकीला सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता बी. के. जनवीर, गणपत मुंडे आदींची उपस्थिती होती.