शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:23 IST

शहरातील नागरिकांना महानगरपालिका ११ पटीने घरपट्टी वाढवून त्यांना तशा नोटिसा देवून दहशत निर्माण करीत आहे़ महानगरपालिकेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही़ शिवसेनेने आतापर्यंत मनपाला सुधारण्याची संधी दिली होती़ परंतु, सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांमधील दरवाढीची दहशत कमी होत नाही़ त्यामुळे शिवसेनाच आता जनतेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील नागरिकांना महानगरपालिका ११ पटीने घरपट्टी वाढवून त्यांना तशा नोटिसा देवून दहशत निर्माण करीत आहे़ महानगरपालिकेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही़ शिवसेनेने आतापर्यंत मनपाला सुधारण्याची संधी दिली होती़ परंतु, सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांमधील दरवाढीची दहशत कमी होत नाही़ त्यामुळे शिवसेनाच आता जनतेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली़परभणी येथे आ़ राहुल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली़ यावेळी बोलताना ते म्हणाले की, महानगरपालिकेने नागरिकांना घरपट्टी वाढी संदर्भात नोटिसा दिल्या आहेत़ त्यामध्ये घरपट्टी वाढीचे दर ११पटीने वाढविले आहेत़ परिणामी स्वत:च्याच घरात राहणाºया नागरिकांना या दरवाढीमुळे किरायाच्या घरात राहतो की काय अशी भीती वाटू लागली आहे़ मनपाकडून शहरात एका महिन्यात केवळ तीन वेळा पाणीपुरवठा केला जातो़ स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे़ शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून न देता सत्ताधाºयांच्या तुमड्या भरण्यासाठी नागरिकांकडून घरपट्टीच्या नावाखाली कर वसुली केली जात आहे़ सर्वसामान्यांना त्रास देवून व दहशत पसरवून वसूल केल्या जाणाºया घरपट्टीला शिवसेनेचा कडाडून विरोध आहे़ यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल़ शिवाय शासनाकडे याबाबत दाद मागू़ वेळप्रसंगी न्यायालयातही धाव घेतली जाईल, असा इशाराही यावेळी आ़पाटील यांनी दिला़ शासनाने २००८ पर्यंत विना परवाना झालेली बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला असतानाही मनपा गेल्या २५ वर्षांपासूनची घरपट्टी दंडासह वसूल करण्याचा तगादा लावत आहे़ त्यामुळे मनपाने दिलेली नोटीसच गैरकायदेशीर असून, ती रद्द झाली पाहिजे, असेही आ़ पाटील म्हणाले़ यासाठी जनतेमध्ये जाऊन जनजागृती करणार असून, यापुढील काळात शिवसेना स्टाईलने शहरात आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला़ शहरात अतिक्रमण हटवितानाही मनपाकडून पक्षपाती धोरण अवलंबिले जात असल्याचे ते म्हणाले़ शिवसेनेकडून आगामी काळात महारोजगार मेळावा घेतला जाणार असून, महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे़ शिवाय सामूहिक विवाह सोहळ्याचेही फेब्रुवारी महिन्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे, सदाशिव देशमुख, संजय घाडगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे आदींची उपस्थिती होती़