शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पक्षप्रमुखांनी राऊत यांचा राजीनामा घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:36 IST

आचार्य नयनपद्म स्वामी यांच्या विरोधात शिवसेना खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांचा राजीनामा घ्यावा असा इशारा सकल जैन समाजातर्फे गुरुवारी येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आचार्य नयनपद्म स्वामी यांच्या विरोधात शिवसेना खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांचा राजीनामा घ्यावा. तसेच राऊत यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे हे पक्षाकडून सांगण्यात यावे. मुनीश्रींच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत राऊत यांनी माफी मागितली तरच समाजाच्या संतप्त भावना शांत होतील. अन्यथा येथून मागे समाजाच्या भावना दुखावल्यानंतर जशी अवस्था एका भावाच्या पक्षाची (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे नाव न घेता) झाली, तीच अवस्था दुसºया भावाच्या पक्षाची (उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नाव न घेता) होईल, असा इशारा सकल जैन समाजातर्फे गुरुवारी येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.शिवसेना खा.राऊत यांनी मीरा-भार्इंदर मनपा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आचार्य नयनपद्म स्वामींच्या विरोधात वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. खा. राऊत यांनी मुनीश्रींची तुलना ‘इसिस’शी संबंधाचा आरोप असलेल्या झाकीर नाईकशी केली. तसेच निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचे फतवे मुनींनी काढल्याने ते राजकीय गुंड असल्याची टीका राऊत यांनी केली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटण्यास सुरुवात झाली आहे.जाधवमंडीतील श्री विमलनाथ जैन मंदिरात सकल जैन समाजाची व्यापक बैठक झाली. बैठकीला सर्व स्तरातील समाजबांधवांनी हजेरी लावली. बैठकीमध्ये खा.राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात शुक्रवारी दुपारी १२ वा. जिल्हाधिकाºयांना भेटून निवेदन देण्याचे ठरले.पर्युषण मास समाप्तीनंतर खा.राऊत यांच्या वक्तव्या विरोधात मूक मोर्चा, धरणे आंदोलन, निदर्शने, सभा किंवा स्थानिक शिवसेना नेत्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच जे समाजबांधव शिवसेनेत काम करीत असतील त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याचे आवाहनही यावेळी करण्यातआले.बैठकीला सकल मारवाडी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम दरख, सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी, उपाध्यक्ष प्रशांत देसरडा, खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ललित पाटणी, तेरा पंथीय समाजाचे अध्यक्ष राजा डोसी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष प्रकाश बाफना, खंडेलवाल जैन समाजाच्या अध्यक्षांसह ताराचंद बाफना, शांतीलाल संचेती, स्वरूपचंद भरंड, प्रकाश बाफना, विलास सावजी, ऋषभ कासलीवाल, विनोद बोकलिया, प्रवीण पारख, रवी लोढा, मनीषा भन्साली, सी.ए.रोहन आचलिया, अ‍ॅड.यतीन ठोले, पदमकुमार जैन, संतोष चोरडिया, मनोज बोरा आदींची उपस्थिती होती.