उस्मानाबाद : मागील काही वर्षांत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे. शिवसेनेला अन्य कुठल्याही पक्षाच्या कुबड्यांची गरज नसून बाजार समितीची निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढविणार असल्याचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी सोमवारी जाहीर केले. उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे. उस्मानाबाद बाजार समितीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून, तेथे राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीची गरज असल्याचे सांगत रविवारी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय लढण्याचा निश्चय जाहीर केला होता. याच्या दुसऱ्याच दिवशी सर्वपक्षीय आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीला शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक मुजीब पठाण, तालुका प्रमुख दिलीप जावळे, उपसरपंच सुरेश पाटील, संजय देशमुख, वाहतूक सेना जिल्हा संघटक बालाजी पवार, कामगार सेना जिल्हा संघटक प्रणिल रणखांब यांच्यासह दादा कोळगे, राजाभाऊ घोडके, पप्पू मुंडे, खालेद शेख, पांडू भोसले, सौदागर जगताप आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जिल्हा संपर्क प्रमुख गौरीश शानबाग आणि सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेना निवडणूक लढविणार असून, बाजार समितीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहनही पाटील यांनी या बैठकीत केले. (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की अन्य पक्षाची साथ घ्यायची, याबाबचा निर्णय घेण्यासाठी जिल्हा भाजपाच्या वतीने समन्वय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली. सोमवारी शासकीय विश्रामगृहावर भाजपा तालुका शाखेची बैठक झाली. बैठकीला नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अॅड.खंडेराव चौरे, सतीश देशमुख, रामदास कोळगे, रमेश रणदिवे, जीवन देशमुख, तानाजी पाटील अशी सहा सदस्यांची समिती सर्वसहमतीने नियुक्त करण्यात आली. या समितीला निवडणुकीसंदर्भात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी दिली.राष्ट्रवादीची आज बैठक४कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांनी राष्ट्रवादी विरोधात जोर लावलेला असतानाच मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी भवन येथे सकाळी १० वाजता आ. राणाजगजितसिंह पाटील, जीवनराव गोरे, अमोल पाटोदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला पक्षाच्या सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना लढणार स्वबळावरच
By admin | Updated: March 15, 2016 01:09 IST