शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात शिवसेना भाजपवर वरचढ...!

By admin | Updated: March 22, 2017 00:39 IST

जालना : जिल्हा परिषदेत सर्वात कमी १४ जागा असतानाही अध्यक्ष पद खेचून आणण्याची किमया शिवसेनेने मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साधली.

जालना : जिल्हा परिषदेत सर्वात कमी १४ जागा असतानाही अध्यक्ष पद खेचून आणण्याची किमया शिवसेनेने मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साधली. कॉँग्रेस, राष्टवादी कॉँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी होती. आघाडीला १८ जागा मिळाल्या, तर दोन अपक्ष निवडून आले. पैकी एकाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या अपक्षानेही शिवसेनेला मतदान केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनिरुध्द खोतकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सतीश टोपे हे विराजमान झाले. कमी जागा जिंकूनही सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपावर शिवसेना वरचढ ठरली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. शिवसेनेतर्फे अनिरुध्द खोतकर यांनी तर भाजपातर्फे अवधूत खडके यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. यात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. खोतकर यांच्या बाजूने ३४ तर खडके यांच्यासाठी २२ जणांनी हात उंचावून मतदान केले. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सतीश टोपे यांच्याबाजूने ३३ तर शिवसेना बंडखोर महेंद्र पवार यांना २३ जणांनी मतदान केले. निवडणूक निवडणूक अधिकारी खपले यांनी अध्यक्षपदी अनिरुध्द खोतकर तर उपाध्यक्षपदी सतीश टोपे विजयी झाल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागून होते. भाजपाच्या सर्वाधिक म्हणजेच २२ जागा निवडून आल्या. तर शिवसेना १४, राष्ट्रवादी काँग्रेस १३, काँग्रेस ५ आणि अपक्ष २ जागांवर निवडून आले होते. बहुमतापासून सात जागा दूर असलेल्या भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक पातळीवरील राजकीय गणितांमुळे भाजपा बहुमत मिळविणे अवघड गेले. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भविष्यातील राजकीय गणिते ओळखत समीकरणे जुळविली. भाजपाची जिल्ह्यातील घौडदौड रोखण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले. निवड जाहीर होताच एकच जल्लोष करण्यात आला. (प्रतिनिधी)