शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून दररोज ९ लाख लिटर पाणी

By admin | Updated: May 5, 2016 00:23 IST

लातूर : शिवसेनेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.

पक्ष प्रमुखांच्या हस्ते शुभारंभ : ५० टँकरच्या दररोज दीडशे फेऱ्या...लातूर : शिवसेनेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. ५० टँकरच्या प्रत्येकी तीन फेऱ्या याप्रमाणे दररोज दीडशे फेऱ्या करून ९ लाख लिटर्स पाण्याचे वितरण केले जाणार आहे. यापूर्वी दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता त्यात ४० टँकरची वाढ केली असल्याची माहिती यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली.लातूर शहर व जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मनपाकडून १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवसेनेकडूनही दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. बुधवारपासून त्यात टँकरची वाढ करण्यात आली आहे. ४० टँकरची अतिरिक्त वाढ केल्याने आता ५० टँकरने शिवसेनेकडून पाणीपुरवठा होणार आहे. दररोज ९ लाख लिटर्स पाणी नागरिकांना वितरण करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे असल्याचे संपर्क प्रमुख सावंत यांनी सांगितले. लातूर शहरात कचऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला असून, जागोजागी कचरा साचतो आहे. त्यामुळे शिवसेनेने प्रत्येक प्रभागात कचरा कुंड्या देण्याचे नियोजन केले आहे. प्रारंभी शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या नऊ प्रभागांत कचरा कुंड्या देण्यात येणार आहेत. त्याचाही प्रारंभ बुधवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना नगरसेवक असलेल्या प्रभागांत कचरा कुंड्या दिल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागांत कचरा कुंड्या दिल्या जाणार आहेत. स्वच्छ शहर, सुंदर शहर... ही संकल्पना शहराची आहे. परंतु, डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात कचरा साचत आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वरवंटी येथील कचरा डेपो परिसरात जाऊन पाहणी केली. तेथील ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले असून, मनपा प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत. परंतु, शिवसेनेच्या वतीने कचरा रस्त्यावर दिसू नये म्हणून शिवाय कचरा उचलण्यास सोपे जावे म्हणून कचरा कुंड्या दिल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १०० ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक टाकी देण्याचे नियोजन केले असून, त्याचाही शुभारंभ पक्ष प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला. तीन हजार लिटर्स क्षमतेच्या या टाक्यांचे ग्रामपंचायतींकडे लोकार्पण केले असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. (प्रतिनिधी)सामाजिक बांधिलकी...लातूर जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. यंदा तर तीव्र पाणीटंचाई आहे. दोन महिन्यांपासून नळाला पाणी बंद आहे. शासन व प्रशासन त्यांच्या पातळीवर पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न करीत आहे. शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत पाणी वितरणासाठी ५० टँकरची सोय करून दररोज ९ लाख लिटर्स पाणी वाटप केले जाणार आहे.