शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, भाजपचे एकला चलो रे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:54 IST

स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामपंचायत हा सत्तेतील शेवटचा दुवा. या सत्तेतून जनाधार वाढवत आपली व्होटबँक तयार करण्याचा प्रयत्न होत असतो. ज्या पक्षाच्या ताब्यात अधिक ग्रामपंचायती, तो पक्ष प्रबळ मानला जातो. हेच सूत्र अवलंबत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठका घेत ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या काळात आॅक्टोबर हीटबरोबरच राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरील ग्रामपंचायतींचे परावलंबित्व कमी करत विकास कामांचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. म्हणूनच शेवटच्या स्तरावरील सत्ता आपल्याकडेच असावी, असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. त्यानुसार भाजपने बैठका घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत. निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार करीत अधिकाधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे उद्दिष्ट पक्षाच्या नेत्यांनी ठेवले आहे.गत काही महिन्यांत भाजपने पक्षविस्तार करत कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला असून, ग्रामीण भागात आपली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, माजी आ. अरविंद चव्हाण, जि.प.सदस्य राहुल लोणीकर यांनी ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून, ग्रामीण भागात पक्ष रुजविण्याची ही नामी संधी साधण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे.किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. जालन्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत नेत्यांनी तशी भूमिका जाहीर केली आहे. पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून, ग्रामीण भागात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली असून, शिवसैनिकांना ‘चार्ज’ केले जात आहे.शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिवाजी चोथे, डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे यांनी ग्रामीण भागात बैठका घेऊन राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढत शिवसेना नेत्यांनी भाजपला कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना आखली आहे.आपापले पारंपरिक गड राखण्यासोबत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांचे गड कायम राहतात की याला सुरुंग लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोणत्या पक्षाला ‘आॅक्टोबर हीट’ चा फटका बसतो, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.