शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्रामला पाहिजे औरंगाबादेतील मतदारसंघ

By admin | Updated: August 9, 2014 00:55 IST

शिवसंग्रामला पाहिजे औरंगाबादेतील मतदारसंघ

औरंगाबाद : शिवसंग्राम संघटनेचे आता पक्षात रुपांतर केले असून महायुतीत हा घटक पक्ष आहे. सर्व जण एकत्रितपणे काम करणार असून विधानसभा निवडणुकीनिमित्त महायुतीच्या जागा वाटपात शिवसंग्रामही सहभागी आहे. त्यामुळे जागा मिळणार आहेत. यामध्ये औरंगाबादमध्येही जागा मागितल्या आहेत. शहर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी जागा मागितल्या आहेत. येथे एक तरी जागा शिवसंग्रामला मिळेलच, असे शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी सांगितले.शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शुक्रवारी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. तानाजी शिंदे, विभागीय सरचिटणीस वामन राऊत, भारतीय किसान मोर्चाचे कैलास सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद तांबे, सलीम पटेल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. मेटे म्हणाले, महायुतीच्या सर्व घटक पक्षांशी विचारविनिमय झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसंग्रामचा आमदार विधानसभेत जाईल. ज्या गोष्टीसाठी झगडत होतो, त्या संघर्षाला आलेले यश हे जनतेचे आहे. मराठा आरक्षणाची अर्धी लढाई जिंकली असून पुढील लढाईसाठी सज्ज आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. मेटे यांनी यावेळी केली. प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी औरंगाबाद मध्य, गंगापूर आणि पैठण हे विधानसभा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सोडवून घेण्याची मागणी केली.