संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिर्डी विमानतळाच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसले. गेली अनेक वर्षे औरंगाबादकर प्रतीक्षा करीत असताना शिर्डीतून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील. दहा विमान कंपन्या शिर्डीतून सेवा देण्यास इच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या या प्राधान्यक्रमामुळे आगामी काळात शिर्डीचे ‘टेकआॅफ’ आणि औरंगाबाद ‘लॅण्ड’ होण्याची भीती आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि एअर कार्गोची सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला; परंतु देशांतर्गत विमानसेवेत वाढ होण्यास आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची वाट पाहावी लागत आहे. आजघडीला एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे.
शिर्डीचे ‘टेकआॅफ’, औरंगाबाद ‘लॅण्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:26 IST