शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १४३५ पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १४३५ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण कंपनीने ९ ते १९ मे दरम्यान औरंगाबाद परिमंडळातील सुमारे ९०० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १४३५ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापले आहे. ५७ कोटी ९३ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी कंपनीने पाणीपुरवठा योजनांना कारवाईचा शॉक दिला आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. या पाणीपुरवठा योजनांच्या बिलांबाबत जिल्हा परिषदेने गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंचांवर जबाबदारी टाकून हात वर केले आहेत, तर महावितरण कंपनीने व्याज व दंडाची रक्कम वगळता मूळ वीज बिल भरले तरच वीजपुरवठा सुरळीत करण्याची भूमिका घेतल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले, जि. प. सीईओंना भेटून वीज बिलांची मागणी केली होती. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बिल देण्यासाठी त्यांना मागणी केली; परंतु त्यांनी आमच्या मूळ वीज बिल मागणीकडे जि. प. सीईओंनी लक्ष दिले नाही.बहुतांश ग्रामपंचायतींनी वीज बिलाची रक्कम भरलेली नाही. २३७७ कनेक्शन दोन जिल्ह्यांत आहेत. त्यातील १२६ योजनांनी वीज बिल भरले, तर १४३५ कनेक्शनचे वीज बिल कापण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित असतानाही काही पाणीपुरवठा योजना सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. नवीन कनेक्शन घेऊन त्या योजना सुरू आहेत काय, त्याकडेही कंपनी लक्ष देत आहे. ४३१ औरंगाबाद आणि १००४ जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना बंद आहेत. ५७ कोटींच्या थकबाकीमध्ये १९ कोटींचे व्याज असल्याचे त्यांनी नमूद केले.