शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण गाव विकासाचा ‘शेलवाडा’ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:08 IST

जालना : लोकसहभाग आणि योग्य मार्गदर्शनामुळे काय साध्य होऊ शकते, याचा आदर्शवत पॅटर्न शेलवाडा गावाने निर्माण केला आहे.

राजेश भिसे । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसहभाग आणि योग्य मार्गदर्शनामुळे काय साध्य होऊ शकते, याचा आदर्शवत पॅटर्न शेलवाडा गावाने निर्माण केला आहे. गाव व्यसनमुक्त करण्यासह नैसर्गिक पद्धतीने गावाची पाण्याची गरज पूर्ण केली आहे. परिणामी गावाचा हिशोब पारदर्शी होऊन ग्रामस्थांचे आरोग्यही सुधारले आहे. शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांची कार्यक्षमताही वाढल्याचे आढळून आले आहे.परतूर शहराजवळ ८० उंबरठ्यांचे शेलवाडा हे गाव दुष्काळाने होरपळलेले असल्याने पाणी ही तेथील मुख्य समस्या होती. या गावातील ग्रामस्थांनी अरुणिमा फाऊंडेशनशी संपर्क साधला आणि मार्गदर्शनासह गाव विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर गावात प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने जलसंधारणाची कामे घेण्यात आली. यात गुगल मॅप आणि औरंगाबादच्या रफिक झकेरिया महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रमुख कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर आवश्यक तेथेच जलसंधारणासह साखळी बंधारे उभारण्याची कामे हाती घेण्यात आली. यासाठी लोकसहभागातून चार लाखांचा निधी संकलित करण्यात आला. याचे चांगले परिणामी दिसून आले. तसेच परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढून भूगर्भातील पातळीही वाढल्याचे दिसून आले. गाव विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपास आलेल्या शिवणीचे उद्धव खेडेकर यांच्या सहकार्याने गावातील विविध भागांत बांधबंदिस्तीची कामेही करण्यात आली. त्यानंतर शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यासाठी गोपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी देशी गायींबाबत माहिती देण्यात आली. देशी गायीच्या दुधाचे लाभ आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय याचीही माहिती शेतकऱ्यांना दिली. यानंतर शेतीपूरक व्यवसायातून शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. परिणामी गावात गत वर्षभरात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही.