शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:38 IST

सध्या शिवसेना गटबाजीने पोखरली असून, त्याचा प्रत्यय सतत येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्या शिवसेना गटबाजीने पोखरली असून, त्याचा प्रत्यय सतत येत आहे. नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नड येथे होणाºया कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत त्या भागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांना स्थान देण्यात आले नाही. मात्र इतर भागाचे जिल्हाप्रमुख असलेले अंबादास दानवे यांच्या नावाला अग्रक्रम देण्यात आला आहे.शिवसेनेतील गटबाजीचा वारंवार प्रत्यय येत आहे. चार दिवसांपूर्वीच खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात संस्थान गणपती येथे रस्त्यावरच जोरदार खडाजंगी झाली होती. प्रकरण हातघाईवर जाणार असतानाच उपस्थितांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा ठेवला आहे. या सोहळ्यानिमित्त निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या निमंत्रण पत्रिकेतसुद्धा राजकारण केल्याचे एका गटाचे म्हणणे आहे. शिवसेनेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन जिल्हाप्रमुख नेमले जातात.या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या अधिकार क्षेत्राचे वाटप झालेले असते. या अधिकारानुसार कन्नडचे जिल्हाप्रमुख म्हणून नरेंद्र त्रिवेदी यांच्याकडे पदभार आहे; मात्र आ.जाधव यांनी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांनाच स्थान देण्यात आलेले नाही.याचवेळी इतर भागाचा पदभार असलेले दुसरे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव अग्रक्रमाने छापण्यात आले आहे. यावरून सध्या शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. या निमंत्रण पत्रिकेवर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आ. संजय शिरसाठ, नंदकुमार घोडेले आणि अंबादास दानवे यांना स्थान देण्यात आले आहे; मात्र नरेंद्र त्रिवेदींना डावलण्यात आल्याचे दिसून येते.