शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शर्वरी भारतीय बॉक्सिंग संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 01:00 IST

रोहतक येथे आज झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन पंच मारणारी औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू शर्वरी कल्याणकर हिची भारतीय ज्युनिअर संघात निवड झाली आहे. दुबई येथे ८ ते १९ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत शर्वरी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. औरंगाबाद येथील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव करणाºया शर्वरी कल्याणकर हिने जबरदस्त कामगिरी करताना रोहतक येथे आज संपलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ६७ ते ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करतानाच तिने दुबई येथील ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले. अशी जबरदस्त कामगिरी करणारी शर्वरी कल्याणकर ही मराठवाड्याची पहिली खेळाडू आहे.

ठळक मुद्देज्युनिअर आशियाई स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व : राष्ट्रीय स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

औरंगाबाद : रोहतक येथे आज झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन पंच मारणारी औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू शर्वरी कल्याणकर हिची भारतीय ज्युनिअर संघात निवड झाली आहे. दुबई येथे ८ ते १९ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत शर्वरी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.औरंगाबाद येथील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव करणाºया शर्वरी कल्याणकर हिने जबरदस्त कामगिरी करताना रोहतक येथे आज संपलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ६७ ते ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करतानाच तिने दुबई येथील ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले. अशी जबरदस्त कामगिरी करणारी शर्वरी कल्याणकर ही मराठवाड्याची पहिली खेळाडू आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या कामगिरीदरम्यान तिने हरियाणा, पंजाबच्या खेळाडूंना धूळ चारली. तिने उपउपांत्यपूर्व फेरीत दिल्ली, उपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेश, उपांत्य फेरीत हरियाणा आणि अंतिम फेरीत पंजाबच्या खेळाडूला धूळ चारत सुवर्णपदकावर आपले नावकोरले. शर्वरी कल्याणकर हिने याआधी २४ ते २८ जुलैदरम्यान औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेचे प्रतिनिधित्व करताना रायगड येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना रोहतक येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील आपली निवड पक्की केली होती. याआधी तिने गुवाहाटी येथे गतवर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. विशेष म्हणजे अवघ्या २ वर्षांतच शर्वरी कल्याणकर हिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकण्यापर्यंत मजल मारली आहे. या यशाबद्दल तिचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर व शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी अभिनंदन केले.खांद्याला दुखापत होती. तरीही चांगला सराव केला असल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द होती. रोहतक येथील गोल्डन कामगिरीने आत्मविश्वास उंचावला असून, दुबई येथील ज्युनिअर आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावून खेळू. भारताची दिग्गज खेळाडू मेरी कोम ही माझी आदर्श असून माझे मुख्य धेय हे देशासाठी आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे आहे.-शर्वरी कल्याणकरशर्वरी कल्याणकर ही मेहनती खेळाडू असून तिचे भवितव्य उज्ज्वल आहे. तिच्यात इच्छाशक्ती तीव्र आहे. तिला तिच्या पालकांचाही चांगला पाठिंबा आहे. ती राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावील, असा विश्वास होता. यासाठी तिने गत महिन्यात खूप कसून सराव केला. दुबई येथील आशियाई स्पर्धेतही ती निश्चितच चांगली कामगिरी करील, असा विश्वास आहे.- सनी गेहलावत (प्रशिक्षक)शर्वरी कल्याणकर ही औरंगाबादची प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू आहे. अवघ्या काही वर्षांतच तिने ही देदीप्यमान कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकून ज्युनिअर आशियाई स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवणे ही मराठवाड्यासाठी भूषणावह बाब आहे. या कामगिरीमुळे शर्वरीचा आदर्श घेऊन आणखी दर्जेदार खेळाडू शहरातून पुढे येतील. आवश्यकता पडल्यास संघटनेतर्फे तिला आर्थिक पाठबळही दिले जाईल.-पंकज भारसाखळे,सचिव, शहर बॉक्सिंग संघटना