शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

परंड्यात सभापतीपदासाठी तगडी ‘फिल्डींग’

By admin | Updated: March 4, 2017 00:31 IST

परंडा : पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवून राष्ट्रवादीने १० पैकी सात जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित बहुमत राखले आहे़

परंडा : पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवून राष्ट्रवादीने १० पैकी सात जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित बहुमत राखले आहे़ आता सभापती, उपसभापती निवडीच्या हलचालींना वेग आला असून, प्रणिता मोरे व अनुजा दैन ही नावे सध्या आघाडीवर आहेत़ सभापतीपदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी या दोन्ही उमेदवारांच्याकडून मोठी फिल्डींग लावण्यात येत आहे़परंडा पंचायत समिती निवडणुकीत १० पैकी सात जागा राष्ट्रवादीला, दोन शिवसेनेला तर एक जागा भाजपाला मिळाली आहे़ यापूर्वी पंचायत समितीवर शिवसेना-रिपाइं यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. शिवसेनेने बहुमताच्या जोरावर सभापतीपद काशीबाई इतापे यांना तर उपसभापतीपद मेघराज पाटील यांना दिले होते. अडीच वर्षानंतरही इतापे यांच्यासह मेघराज पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली होती़ सलग पाच वर्ष या दोघांनी ही पदे संभाळली़ मात्र, या निवडणुकीत सभापती काशीबाई इतापे पराभूत झाल्या़ तर शिवसेनेने मेघराज पाटील यांना या निवडणुकीत डावलले होते. सत्ताधारी शिवसेनेसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये चौरंगी लढत झाली़ आमदार राहुल मोटे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार प्रा़ तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ मात्र, या निवडणुकीत आमदार राहुल मोटे यांनी बाजी मारत पंचायत समितीच्या दहा पैकी सात जागा जिंकून पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त केले. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे. सद्यस्थितीत आनाळा गणाच्या नवनिर्वाचित सदस्या प्रणिता मोरे यांचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर आहे़ मात्र, शेळगाव सर्कलचे अ‍ॅड़ सुभाष मोरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शेळगाव गणातून अनुजा दैन यांनी मोठया फरकाने विजयश्री प्राप्त केली आहे़ त्यामुळे त्यांच्या नावालाही राष्ट्रवादी काँग्रेसमधून पसंती दिली जात आहे. सभापती पदासाठी दैन व मोरे यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच सुरु असून, दोन्ही बाजूंनी जोरदार फिल्डींग लावली जात आहे़ त्यामुळे सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.