शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:03 IST

औरंगाबाद :शरद पवार यांच्या विधिमंडळ व संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधिमंडळ व संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार सोहळा येत्या शनिवारी (दि.२९) देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता होणार असल्याची माहिती सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व कार्याध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.शरद पवार यांच्या सुवर्णमहोत्सवी संसदीय कारकीर्दीनिमित्त राज्यातील विविध भागांत नागरी सत्कार घेण्यात येत आहेत. यामुळे मराठवाड्यातर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, पवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या तारखा जुळत नसल्यामुळे कार्यक्रमास दोन महिने उशीर झाला आहे. शेवटी २९ जुलै ही तारीख अंतिम झाल्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असल्याचे कागलीवाल यांनी सांगितले. पवार यांचा सत्कार केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सोहळ्याला विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्वपक्षीय खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला नागरी सत्कार सोहळा समितीचे सदस्य प्राचार्य प्रतापराव बोराडे, अंबादास दानवे यांच्यासह पंडितअण्णा हर्षे, अभिजित देशमुख, मोहन सावंत आदी उपिस्थत होते.