शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तीसगावच्या सरपंचपदी शंकुतला कसुरे, तर उपसरपंचपदी नागेश कुठारे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:03 IST

येथील सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने सरपंचपदासाठी शंकुतला कसुरे व निर्मला बुट्टे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र गावांच्या ...

येथील सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने सरपंचपदासाठी शंकुतला कसुरे व निर्मला बुट्टे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र गावांच्या विकासासाठी एकत्रित येण्याचा निर्णय घेत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सरपंचपदी शंकुतला कसुरे, तर उपसरपंचपदी नागेश कुठारे

सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी तीसगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत सरपंचपदासाठी शंकुतला कसुरे व रेणुका सलामपुरे, तर उपसरपंचपदासाठी नागेश कुठारे व नितीन जाधव यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यावेळी गुप्त पद्धतीने मतदानप्रकिया पार पडल्यानंतर शंकुतला कसुरे यांना १०, तर रेणुका सलामपुरे यांना सात मते मिळाल्याने शकुंतला सलामपुरे यांना ३ मताने विजयी घोषित करण्यात आले. उपसरपंचपदासाठी नागेश कुठारे यांनी विरोधी गटाचे एक मत फोडल्याने त्यांना ११, तर त्यांचे प्रतिस्पर्धी नितीन जाधव यांना सहा मते मिळाली. सरपंचपदी शकुंतला कसुरे व उपसरपंचपदी नागेश कुठारे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य राजेश कसुरे, अश्विनी जाधव, कृष्णा गायकवाड, अरुणा जाधव, शकुंतला कसुरे, संजय जाधव, प्रदीप हंडे, निर्मला बुट्टे, नागेश कुठारे, गणेश बिरंगळ, पूजा तरय्यावाले, रेणुका सलामपुरे, गोदावरी कोल्हे, नितीन जाधव, रेखा सूर्यवंशी, विष्णू जाधव व संगीता अंभोरे आदींची उपस्थिती होती. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून हनुमान शिंदे, तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी ए. आर. गायकवाड यांनी काम पाहिले. सरपंच व उपसरपंचपदाची बिनविरोध निवड होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत व फटाके वाजवून जल्लोष केला.

फोटो क्रमांक- शकुंतला कसुरे (सरपंच)

फोटो क्रमांक- नागेश कुठारे (उपसरपंच)