लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एकाचवेळी तीन हजार विद्यार्थ्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सहा हजार वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम सोमवारी पालवण घाटात पार पडणार आहे. सह्याद्री देवराई प्रतिष्ठाणच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे.बीड पासून पाच कि़मी. अंतरावर असलेल्या पालवण घाटात सोमवारी सकाळी ८ वा. वृक्ष लागवड कार्यक्रम होणार आहे. यासाठी अभिनेते सयाजी शिंदे, अरविंद जगताप, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यंवशी, अमोल सातपुते आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शहरातील १५ शाळेतील तीन हजार विद्यार्थी सकाळी प्रदुषण मुक्तीसाठी सायकल रॅली काढतील. त्यानंतर सायकलवरूनच ते पालवण घाटात जाणार आहेत. नियोजनासाठी १५० स्वयंसेवक तर बंदोबस्तासाठी पोलीस असणार आहेत. प्रतिष्ठाण आणि वनविभागाने तब्बल ४० एकरात हे खड्डे खोदले आहेत. यामध्ये ६० जातींचे देशी व वन औषधी झाडे लावले जातील. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवराम घोडके, डॉ.प्रदीप शेळके, राजु शिंदे, अनिल शेळके यांच्यासह वनविभागाने केले आहे.
सयाजी शिंदेंसह मित्र लावणार झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:03 IST