शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

‘शाडू’चे बाप्पा मुलांना भावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 00:27 IST

जालना : इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याच्या सोमवारपासून सुरू झालेल्या उपक्रमास शुक्रवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात दोन शाळा

जालना : इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याच्या सोमवारपासून सुरू झालेल्या उपक्रमास शुक्रवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात दोन शाळा आणि एका कोचिंग क्लासेसमध्ये तब्बल ५१० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पर्यावरण बचावच्या दिशेने टाकण्यात आलेल्या पावलास विद्यार्थ्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आगामी काळात ही लोकचळवळ होण्याचे संकेत आहेत.लोकमत वृत्तपत्र समूह आणि मैत्र मांदियाळी प्रतिष्ठाणच्या वतीने पाच दिवसांपासून जालना शहरातील विविध शाळांमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण मोरया फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून दिले गेले. शुक्रवारी रामचंद्र किनगावकर विद्यालय, पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि अभिजात कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या काही वर्षांत विविध प्रकारच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. परिणामी ग्लोबल वार्मिंगसारखे जागतिक प्रश्न निर्माण होऊन ऋतुचक्र बिघडले आहे. गेल्या काही वर्षात पर्जन्यमानही कमी झाले आहे. याचा थेट परिणाम मानवी जीवनावर झाला असून, मराठवाड्यात तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच ऋतुचक्र बदलामुळे अडचणीत आली आहे. याचे परिणाम मानवी आरोग्यावरही होत असून, वेळीच यावर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती अनेक अभ्यासातून दिसून आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भावी पिढीत याबाबतची जनजागृती व्हावी, जेणेकरून प्रदुषण कमी होऊन निसर्गाचा समतोल साधला जाऊ शकेल. लोकमत वृत्तपत्र समुहाने या दिशेने पाऊल टाकत मैत्र मांदियाळी प्रतिष्ठाणच्या मदतीने जालना शहरातील दहा शाळांमध्ये शाडू माती गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. या छोट्याशा उपक्रमाचे आगामी काळात लोकचळवळीत रूपांतर होण्यास मदतच होईल, असेच चित्र गेल्या पाच दिवसांत विविध शाळांत दिसून आले. गेल्या पाच दिवसांत एक हजार पन्नास विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. यामध्ये विविध धर्मांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, हे विशेष!उप्रकमास मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे, एस. एम. फुके, बारवकर, कैलास शिंदे, अमोल घुगे, निवृत्ती रुद्राक्ष, ज्ञानेश्वर सातपुते, अरुण वादरळ, धम्मरत्न कुटे, प्रदीप इंगोले, शिवम कांबळे, अमोल व्यवहारे, सिद्धार्थ जाधव, फिलीप कसबे, किशोर ढिल्पे, किनगावकर शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा देव, पोदार शाळेचे मुख्याध्यापक रावत, चकोर, आहेर यांच्यासह शिक्षकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)