जालना : आगामी गणेशोत्सवात पर्यावरण पूरक अशा शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा गुरुवारी घेण्यात आली. राष्ट्रीय हरित सेना, सृष्टी फाऊंडेशन व सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने ही कार्यशाळा पार पडली. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मूर्तीकार उमेश कापसे व कैलास कापसे यांनी शाडूमातीपासून मूर्ती कशा तयार कराव्यात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यशाळेत जैन मराठी विद्यालय, सिंधी हिंदी विद्यालय, आर्य हिंदी विद्यालय, डग्लस गर्ल स्कूल या विद्यालयातील अंजली बनवारी, कल्पना ब्राह्मणे, ओमप्रकाश मुजमित्रे, नागेश श्रीराम, अभिजित इंगोले, मयूर अंबेकर, कृष्णा लोंढे आदी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लहान मूर्ती तयार केल्या. रंग कोणते व कसे वापरावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या सहाय्यक उपसंचालक पवार, शिंदे, सृष्टी फाऊंडशेनच्या डॉ. प्रतिभा श्रीपत, मधुकर गायकवाड, राम श्रीराम यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
शाडूमाती गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा
By admin | Updated: July 18, 2016 00:58 IST