शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

मराठवाड्यातील रस्त्यांची झाली चाळणी

By admin | Updated: December 17, 2015 00:14 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील १५ हजार ५०० कि़मी. रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील १५ हजार ५०० कि़मी. रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. विभागातील सुमारे २२ हजार कि़मी. रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. त्यातील ७० टक्के रस्ते खड्ड्यांमुळे खराब झाल्याचा प्राथमिक अहवाल बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी विभागाने केली असून, अधिवेशनात त्या मागणीला मंजुरी मिळावी, यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागातील खड्डे बुजविण्यासाठी २ हजार कोटी रुपये लागतील, असा आराखडा मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी ५ डिसेंबर रोजी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला. विभागात केंद्र, राज्य शासनाचे मिळून ६५ हजार ४९७ किलोमीटर रस्ते आहेत. १२ हजार २५२ जिल्हा रस्ते आणि ३१ हजार ३६८ किलोमीटर ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे आहेत. २१ हजार किलोमीटर रस्त्यांची बांधकाम विभाग, तर ८१६ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची देखभाल केंद्र शासन करते. विभागातील रस्त्यांचा २० टक्के घसारा गृहीत धरला, तर सुमारे ४ हजार किलोमीटर रस्त्यांवर खड्डे पडल्याचा अंदाज बांधकाम विभागाने काढला होता. पॅचवर्कसाठी सुमारे १०० ते १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता; परंतु पाहणीनंतर ७० टक्के घसारा झाल्याचे समोर आल्यामुळे पॅचवर्कचा खर्च २ हजार कोटींच्या घरात गेला. विभागातील जुन्या कामांना ३४ कोटी रुपयांची मागणी आहे. नाबार्डच्या कामांसाठी ६६ कोटी, तर ९०० कोटी रुपयांची मागणीनिहाय तरतूद ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या बजेटमध्ये केली आहे. या मागणीचे आठमाही नियोजन करण्यासाठी विभागनिहाय बैठकांचेही आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.