शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

सरपंच पदासाठी सातवी पास अनिवार्यच; मर्जीतील आणि पात्र उमेदवार देताना पॅनल प्रमुखांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:54 IST

सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने आता प्रत्येक प्रवर्गातील  उमेदवार किमान सातवी पास द्यावा लागणार असल्याने पॅनल प्रमुखांची  धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्देसरपंच पदाचे आरक्षण हे निवडणूक पूर्वी न राहता आता निवडणूकीनंतर काढले जाणार आहे.निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी सातवी पास ही अट कायम ठेवली

- विठ्ठल भिसेपाथरी ( परभणी ) : थेट जनतेतून सरपंचनिवडणूक करण्याचा निर्णय घेताना शासनाने सातवी पास अनिवार्य केले होते. आता थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करण्यात येऊन सदस्यातून सरपंच निवडले जाणार आहेत. मात्र,  यासाठी सातवी पास ही अट कायम ठेवण्यात आली आहे.  निवडणूक आयोगाने या बाबत आदेश काढले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने आता प्रत्येक प्रवर्गातील  उमेदवार किमान सातवी पास द्यावा लागणार असल्याने पॅनल प्रमुखांची  धावपळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूकिला राजकीय दृष्ट्या वेगळे महत्व आहे , गाव पातळीवर आपल्या गटाकडे सत्ता आली पाहिजे म्हणजे पुढच्या सर्व निवडणूका मध्ये मताधिक्य मिळविण्यासाठी सोयीचे होते. यासाठी पुढारी मंडळी अधिक सक्रिय दिसून येत आहे. तीन वर्षां पूर्वी राज्य शासनाने सरपंच निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता त्या वेळी सरपंच पदासाठी किमान सातवी पास असणे अनिवार्य करण्यात आले होते , त्या नंतर सत्तातर झाले आणि थेट सरपंच निवडणूक रद्द करण्यात आली , आता निवडून आलेल्या सदस्य यांच्यातून सरपंच निवडणूक घेतली जाणार आहे.

सरपंच पदाचे आरक्षण हे निवडणूक पूर्वी न राहता आता निवडणूक नंतर काढले जाणार आहे. त्या मुळे कोणत्या प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण सुटणार आहे निश्चित नसल्याने उमेदवार देतातं अडचणी निर्माण होत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी सातवी पास ही अट कायम ठेवली असल्याने आता पॅनल प्रमुख आणखीच अडचणीत सापडले आहेत. मर्जीतील आणि सातवी पास उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सातवी पासची  सरपंचपदासाठीची अट निवडणूक आयोगाने कायम ठेवली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून 24 डिसेंबर 2020 रोजी आदेश काढण्यात आले आहेत.

टॅग्स :sarpanchसरपंचparabhaniपरभणीElectionनिवडणूक