प्रसाद आर्वीकर, परभणीजिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत आगामी निवडणुकांत मतदारांची संख्या वाढणार आहे.मागील एक वर्षापासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीला प्राधान्य दिले आहे. त्यातूनच मतदार जागृती कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रथमच राबविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीमुळे यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली. या लोकसभा मतदारसंघात १० टक्क्याने मतदार वाढले होते. विशेष म्हणजे वेळोवेळी मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमातून दीड लाख नवीन मतदारांनी नोंदणी केली होती. लोकसभा निवडणुकीनंतरही ९ ते ३० जून या काळात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयात नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. या मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या कार्यक्रमात १७ हजार ३६८ नवीन मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या आता १२ लाख ८६ हजार ५०५ एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)परभणीत प्रतिसादजिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी परभणी विधानसभा मतदार- संघामध्ये ६ हजार ५८ मतदारांनी नव्याने नोंदणी केली. तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३५४५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ३४९९ आणि पाथरी विधानसभा मतदार- संघात ४३५६ मतदार नव्याने यादीत समाविष्ट झाले आहेत.दीड लाख मतदारांची झाली वाढ मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला होता. प्रत्येक घरोघर जाऊन मतदारांची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणी झाली. त्यामुळे १८ ते २० या वयोगटातील नवमतदार मोठ्या संख्येने मतदार यादीत समाविष्ट झाले होते.बोगस मतदारांचीही उडविली नावेमतदारयादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळेस होती तर काही मतदार मयत झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत शिल्लक होती. त्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असे. जिल्हा प्रशासनाने अशी ८० हजार नावे मतदान यादीतून वगळली होती. विधानसभा मतदारसंख्यावाढीव एकूणजिंतूर३,१६,९३२३४५४३,२०,३८६परभणी२,७२,१४२६०५८२,७८,२००गंगाखेड३,५५,८४७३४९९३,५९,३४६पाथरी३,२४,२१६४३५६३,२८,५७२एकूण१२,६९,१३७१७,३६८१२,८६,५०५
सतरा हजार मतदार वाढले
By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST