शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील साडेपाच हजार विद्युत मीटर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महावितरणच्या वतीने सध्या शहरात वीज बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जवळपास ...

ठळक मुद्देधडक मोहीम : शहरात एक हजाराहून अधिक थकबाकी असलेले ६५ हजार ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या वतीने सध्या शहरात वीज बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जवळपास ५ हजार ५७९ ग्राहकांचे विद्युत मीटर काढून घेऊन ते जप्त करण्यात आलेले आहे.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळ कार्यालयांतर्गत औरंगाबाद शहर मंडळामध्ये १ हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेले घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची संख्या ६५ हजार ६१० एवढी असून, त्यांच्याकडे ७८ कोटी २१ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. शहराच्या विविध उपविभागात महावितरण कंपनीने थकबाकी ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसाठी १ फेब्रुवारीपासून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वसुलीसोबत थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करणे, विद्युत मीटर जप्त करून सदरील ग्राहकाचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याची मोहीम राबविली जात आहे. ज्या उपविभागात वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे, अशा उपविभागाच्या अधिकाºयांना मार्चअखेरपर्यंत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील उपविभागासाठी १३८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत ३९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाºया अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदार ग्राहकांना सातत्याने सूचना दिल्यानंतरही वीज बिल न भरणाºया ग्राहकांचे विद्युत मीटर जप्त करण्यात आले आहे. यामध्ये छावणी-२०१९, पॉवरहाऊस- ४०९, शहागंज-१७५१, सिडको- १०६, चिकलठाणा-७४३, गारखेडा-२७३, क्रांतीचौक-२५२ असे एकूण ५ हजार ५७९ मीटर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.कंडक्टर टेस्टिंग प्रयोगशाळेला मान्यताविद्युत मीटर, इन्सुलेटर आणि ट्रान्स्फार्मरची तपासणी करण्यासाठी महावितरणकडे औरंगाबादेत प्रयोगशाळा आहे. मात्र, राज्यात महावितरणच्या कोणत्याही परिमंडळ कार्यालयाकडे कंडक्टर (विद्युत वाहक तारेची) गुणवत्ता चाचणी करण्याची प्रयोगशाळा नाही. औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाच्या कंडक्टर टेस्टिंग प्रयोगशाळेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. कंडक्टर टेस्टिंगसाठी प्रयोगशाळा असलेले औरंगाबाद परिमंडळ हे राज्यात पहिले परिमंडळ कार्यालय असेल, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले.