शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांपूर्वी पळालेली दोन प्रेमी युगुले ताब्यात

By admin | Updated: July 10, 2017 00:37 IST

पाटोदा : सात महिन्यांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली होती

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : सात महिन्यांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बीड येथील प्रादेशिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अथक परिश्रम घेत चौघांना पनवेल येथे पकडून पाटोदा पोलिसांच्या ताब्यात दिले. तालुक्यातील सौताडा येथे घडलेल्या या प्रकरणातील दोन मुली चुलत बहिणी आहेत. यातील एक तरुणही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. सौताडा येथील उमेश दादाहरी मस्के (वय २०) आणि एका अल्पवयीन मुलाने गावातीलच दोन अल्पवयीन चुलत बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी तक्रारीवरून १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.उपनिरीक्षक सुधीर खारगे यांनी या सैराटांना पकडण्यासाठी मुंबईपर्यंत तपास केला. मात्र, उमेश आणि त्याच्या चुलतभावाने भ्रमणध्वनीतील ‘सीम कार्ड’ बदलल्यामुळे अडथळे निर्माण झाले. शिवाय बदललेल्या सीमवरून ही मुले गावातील लोकांशी संपर्कात होती. पोलीस तपासाची माहिती मस्के बंधू मिळवत होते. त्यानुसार सहा महिने पोलिसांना गुंगारा देण्यात ते यशस्वी झाले.अखेर प्रकरणाचा तपास प्रादेशिक अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाकडे देण्यात आला. पथक प्रमुख उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांच्या पथकाने सखोल माहिती मिळवत मुंबईच्या पनवेल भागात सापळा लावून सैराटांना ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले. उपनिरीक्षक सुधीर खारगे अधिक तपास करत आहेत.