बी.डी. सवडे , अकोला देवजाफ्राबाद तालुक्यातील डावरगाव देवी व निमखेडा चव्हाण या दोन गावांमध्ये एका महिन्यात ७ बालविवाहाला रोखण्याची यशस्वी कामगिरी ग्रामस्थांनी पार पाडली आहे. शासनाने अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लावण्यास कायद्याद्वारे प्रतिबंध केला असला तरी अनेक ठिकाणी त्याला मुठमाती दिली जात असल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. जाफ्राबाद तालुक्यात मात्र जनजागृतीचा चांगला परिणाम दिसून येत आहे. वरील दोन्ही गावांत बालविवाहाची पूर्ण तयारी झाली होती. मात्र काही सजग ग्रामस्थांनी सर्वांना विश्वासात घेऊन हे विवाह थांबविले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये २१ वर्षांच्या आतील पुरुष व १८ वर्षांच्या आतील मुलींचे विवाह करणे गुन्हा ठरतो. असे लग्न लावल्यास आरोपींना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड होऊ शकतो. तर २१ वर्षे पूर्ण केलेल्या पुरुषाने १८ वर्षाखालील मुलीशी विवाह केल्यास त्याला तीन महिने तुुरुंगवास व दंडाची शिक्षा आहे. याच कायद्याची ग्रामीण भागामध्ये फारशी जनजागृती नसल्याने अनेक ठिकाणी बालविवाह लावले जातात. म्हणून जालना जिल्हा प्रशासनाने बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत कडक अंमलबजावणी करणे सुरु केले असून तालुकास्तरावरील सर्व ग्रामपंचायतींना बालविवाह रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीने गावामध्ये ग्रामसभेद्वारे बाल विवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती करणे सुरु केले आहे.४तालुक्यातील डावरगाव देवी येथे चार व निमखेडा येथे तीन बालविवाह रोखण्यात यश मिळाल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चौवलवार, ग्रामविकास अधिकारी पी. आर. सडे, ग्रामसेविका पी. आर. काळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका के. आर. भालके, वर्षा चव्हाण यांनी दिली.
दोन महिन्यांत सात बालविवाह रोखले
By admin | Updated: March 28, 2015 00:42 IST