शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने सर्पमित्राचा लातुरात मृत्यू

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

लातूर : शहरातील एमआयडीसी भागात जीवनरक्षा या संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राण्याशी कायम मैत्री जोपासणाऱ्या राहूल सुवर्णकार (वय २२, रा़भक्तीनगर, आर्वी) या सर्पमित्रांचा घोणस

लातूर : शहरातील एमआयडीसी भागात जीवनरक्षा या संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राण्याशी कायम मैत्री जोपासणाऱ्या राहूल सुवर्णकार (वय २२, रा़भक्तीनगर, आर्वी) या सर्पमित्रांचा घोणस (परड) जातीच्या सर्पदंशाने बुधवारी मृत्यू झाला आहे़लातूर शहरातील राहूल सुवर्णकार हा सर्पमित्र म्हणून अनुप लोभे यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता़ त्याने कमी कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून शहरातील विविध भागात पकडलेले साप स्टंटबाजी करीत काढलेले फोटो तो फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपवर टाकायचा़ त्या फोटोवरून अनेकांनी केलेल्या लाईकमुळे तो मोठ्या उत्साहात शहर व परिसरातील कुठल्याही भागातून नागरिकांचा फोन आला की, तिथे जावून साप पकडायचा व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करायचा़ त्यामुळे अल्पावधीत तो एक चांगला सर्पमित्र म्हणून नावारूपाला आला होता़ लातुरात सर्पमित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामध्ये तो मुक्या प्राण्याशी कायम मैत्री करणारा सर्पमित्र म्हणून नावारूपाला आला होता़ सोमवारी त्याने एमआयडीसी परिसरात घोणस जातीचा साप पकडला़ त्याला घेवून फोटोसेशनसाठी स्टंटबाजी करतांना बंद बरणीतून साप काढतांना राहूल सुवर्णकार या सर्पमित्राला सोमवारी घोणसाने दंश केला असल्याची माहिती त्याच्या सोबत असलेल्या मुखीम शेख, सोहेल तन्वीर, ओम माने यांनी दिली़ त्याला उपचारासाठी लातूरच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)४लातूर तालुक्यातील आर्वी येथील राहुल सुवर्णकार हा सर्पमित्र उत्साही असल्यामुळे कमी कालावधीत त्याने प्रशिक्षण पूर्ण केले आणि सापांशी मैत्री जोपासण्याचे काम करू लागला़ परंतु, सापांसोबतची स्टंटबाजी करताना त्याला सर्पदंश झाला़ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ याबाबत सर्पमित्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र तो स्वयंघोषित सर्पमित्र असल्याचे सांगितले आहे़