शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका सुरूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST

कन्नड : अतिवृष्टीमुळे खरिपाची वाट लागल्याने हैराण झालेला शेतकरी आता कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाला आहे. या संकटातून सावरून कशीबशी ...

कन्नड : अतिवृष्टीमुळे खरिपाची वाट लागल्याने हैराण झालेला शेतकरी आता कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाला आहे. या संकटातून सावरून कशीबशी रबीची पेरणी केली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे गारपीट होण्याच्या भीतीने शेतकरी पुन्हा चिंतातूर झाला आहे.

तालुक्यात वार्षिक सरासरीच्या दीडपट पाऊस पडला. या पावसामुळे मृग नक्षत्रात पेरणी होवूनही मूग, उडीद यांना कोंब फुटले. मकाची कणसे शेतातील पाण्यावर तरंगल्याने खराब झाली. तर कपाशीच्या बोंडे सडल्याने खरिपाची वाट लागली. पाऊस उघडल्यानंतर कपाशीची परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना बोंडअळीने पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केले. चार ते पाच वेचणी होणाऱ्या कपाशीने दोन वेचणीत आटोपते घेतले. झालेल्या नुकसानीची शासकीय मदत पदरात पडली नाही. तोच रबीच्या पिकावरही संकट घोंगावू लागले. आकाशात पुन्हा ढग येत आहेत. त्यामुळे एकतर अवकाळी किंवा गारपीट होण्याची शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे.

आधीच खरिपाची वाट लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा रबीकडे आहेत. मात्र, ढगाळ वातावरणाने शेतकरी पुन्हा धास्तावला आहे.