शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बहीण-भावाची ताटातूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:23 IST

घाटी रुग्णालयामध्ये तसवीर गोंडे (२६, रा. भांबडा, करमाड) या तरुणाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपला भाऊ बरा व्हावा यासाठी दिवस-रात्र जागून काढणारी त्याची बहीण संगीता हिचा लढा अखेर अपयशी ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयामध्ये तसवीर गोंडे (२६, रा. भांबडा, करमाड) या तरुणाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपला भाऊ बरा व्हावा यासाठी दिवस-रात्र जागून काढणारी त्याची बहीण संगीता हिचा लढा अखेर अपयशी ठरला. गेल्या दहा दिवसांपासून घाटीमध्ये आपल्या भावाच्या जिवासाठी तळमळणाºया बहिणीच्या संघर्षाची रविवारी अशी झालेली शोकांतिका पाहून घाटी रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण व नातेवाईकांचे डोळे पाणावले.बकरीला बांधलेल्या दोरीत पाय अडकून पडल्यामुळे दोन वर्षांपासून तसवीर पलंगावर खिळून होता. पायाला प्लास्टर केले. बरेच देशी उपचारही केले; मात्र तो पूर्णपणे बरा झाला नाही. एकाच जागी खिळून राहिल्यामुळे बेडसोअरचा त्रास उद्भवला. फुफ्फुस लहान असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पाठीला व हाताला जखमा झाल्या. वडील ज्योतिषी व भिक्षुकी करून परिवाराचे पोट भरतात. त्यामुळे शहरात जाऊन उपचार घेण्याचे आर्थिक पाठबळ नव्हते.तसवीरची ही शोकांतिका समजताच प्रहार जनशक्ती पक्षाचे सुधाकर शिंदे, रऊफ पटेल, कुणाल राऊत, अमित दांडगे, बाळू भोसले, कल्याण शिंदे हे त्याच्या मदतीला धावले. त्यांनी १३ आॅक्टोबर रोजी तसवीरला घाटी रुग्णालयात वॉर्ड क्र. १७ मध्ये भरती केले. त्याच्या शुश्रूषेसाठी सोबत बहीण संगीताही आली होती. विशेष म्हणजे, दोघांची उंची तीन फूट आहे. घाटीमध्ये ती भावाची जिवापाड काळजी घेत असे. त्यांची हलाखीची परिस्थिती कळल्यावर अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. ‘लोकमत’मध्ये रविवारी या बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचे व संघर्षाचे वृत्त प्रकाशित झाले. तसवीरची तब्येत सुधारत आहे असे वाटत असतानाच रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार होऊ शकत नाही, असे सांगितले होते; परंतु अलीकडे तो बरा होतोय, हे पाहून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. रविवारी पहाटे तसवीरने अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण गावकºयांच्या उपस्थितीत रविवारी तसवीरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. के.के. गु्रप व घाटी प्रशासनाचेही सहकार्य लाभले, असे रऊफ पटेल यांनी सांगितले.