बीड: राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे-बीड बसमध्ये एक बेवारस रिव्हॉल्व्हर शुक्रवारी आढळून आले़ त्यामुळे एकच खळबळ उडाली. सदरील बस येथील स्थानकात आल्यानंतर ती रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बीड ही बस शहराकडे येत असताना पाटोदा येथे हरिभाऊ वनवे त्यामध्ये बसले. त्यावेळी त्यांच्या कमरेला रिव्हॉॅल्व्हर होते. प्रवासादरम्यान त्यांच्याजवळील रिव्हॉल्व्हर गळून पडले; मात्र त्यांना ही बाब लक्षात आली नाही. पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथे वनवे उतरले. दरम्यान, काही अंतरावर बस आली असता बसमधील प्रवाशांना रिव्हॉल्व्हर पडली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गाडीतील प्रवासी भयभीत झाले. बसचा वाहक वनवे यांच्या परिचयाचा असल्याने त्यांनी मोबाईवरुन संपर्क साधला असता सदरील रिव्हॉॅल्व्हर बसमध्ये असल्याचे कळाले. बीड बसस्थानकात बस आल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी रिव्हॉल्व्हर घेतली. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोनि धरमसिंग चव्हाण म्हणाले, वनवे यांचा मुलगा मिल्ट्रीमध्ये असून ही रिव्हॉल्व्हर त्यांच्या मुलाचे नावे आहे़ चौकशी सुरु असून त्यानंतर कारवाईची दिशा ठरवली जाईल, असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
बसमध्ये रिव्हॉल्व्हर आढळल्याने खळबळ
By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST