शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सेनेचे प्रमोद खेडकर विजयी

By admin | Updated: July 1, 2014 00:37 IST

नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रमोद (बंडू ) मुरलीधर खेडकर यांनी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला महादेव निमकर यांचा ४२७ मतांनी पराभव करीत विजय मिळविला़

नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रमोद (बंडू ) मुरलीधर खेडकर यांनी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला महादेव निमकर यांचा ४२७ मतांनी पराभव करीत विजय मिळविला़ खेडकर यांना २ हजार २९३ तर निमकर यांना १ हजार ८६६ मते मिळाली़ सोमवारी सकाळी ९ पासून श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली़ मतमोजणीसाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यानुसार चार फेऱ्या झाल्या़ प्रत्येक टेबलवर चार मतदान यंत्रातील मतांची मोजणी करण्यात आली़ सकाळी साडेदहा वाजता मतमोजणीचा निकाल घोषीत करण्यात आला़ उमेदवारांना मिळालेले मते पुढील प्रमाणे- अब्दुल अ़ रजाक अ़ वहाबसाब (अपक्ष) - १२, अ‍ॅड़ अनुप श्रीराम आगाशे (अपक्ष) - १३, प्रमोद (बंडू ) खेडकर ( शिवसेना)- २२९३, मंगला महादेव निमकर (इंडियन नॅशनल काँग्रेस ) - १८६६, शेख अफसर शेख बाबु (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ११, शेख असलम उर्फ मुन्नाभाई खोकेवाले बनेमियॉ (अपक्ष) - १०९, वाजीद अनवर जागीरदार (इंडियन युनियन मुस्लिम लिग) - १३़ महापालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रथमच नोटाचा अधिकार वापरण्यात आला़ त्यानुसार ४० मतदारांनी नोटाचा वापर केला़ राष्ट्रवादीचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांच्या उमेदवाराला फक्त ११ मते मिळाली़या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ३७़ १ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले होते़ प्रभागातील १६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली होती़ मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहायक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी गुलाम सादेक, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, उपअभियंता शिवाजी बाबरे, सुनील देशमुख, दिलीप टाकळीकर, रमेश चवरे आदींनी काम पाहिले़ दरम्यान, प्रमोद खेडकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़ यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कौडगे, नगरसेवक बाळासाहेब देशमुख, माजी विरोधी पक्ष नेता बाळू खोमणे, श्याम बन, महेश खेडकर, मुकुंद जवळगावकर, प्रविण साले, बिल्लू यादव, विजय बगाटे, पुजारी आदी सहभागी झाले़ (प्रतिनिधी)४० मतदारांनी केला नोटाचा वापर शिवसेनेचे प्रमोद (बंडू) खेडकर यांना २ हजार २९३ तर काँग्रेसच्या मंगला निमकर यांना १ हजार ८६६ मतेचार उमेदवारांना मिळाली १३ च्या आत मते४० मतदारांनी केला नोटाचा वापरचार फेऱ्यात झाली मतमोजणी