शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या बैठकीत नाराजीनाट्य

By admin | Updated: November 6, 2016 00:57 IST

उस्मानाबाद : येथील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख गौरीष शानबाग यांच्या उपस्थितीत शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

उस्मानाबाद : येथील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख गौरीष शानबाग यांच्या उपस्थितीत शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले. बैठकीच्या प्रारंभीच माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके यांनी थेट माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावरच निशाणा साधला. राष्ट्रवादीतून आणून ऐनवेळी मकरंद राजेनिंबाळकर यांना दिलेली उमेदवारी आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. युवासेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंके यांच्याही आचरणातून यावेळी नाराजी दिसून आली. विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख यांची या बैठकीला उपस्थिती नव्हती.बैठकीसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख गौरीष शानबाग, खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष भारत इंगळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, संजय निंबाळकर, पप्पु मुंडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठक सुरू झाल्यानंतर काही क्षणातच प्रदीप साळुंके यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत नाराजीचा सूर आळवला. ओमराजे शिवसेनेत आल्यापासूनच पक्षात गटबाजी वाढल्याचे सांगत, वर्षानुवर्ष सेनेचे काम करणाऱ्या शिवसैनिकाला डावलून ऐनवेळी राष्ट्रवादीच्या मकरंद राजेनिंबाळकर यांना दिलेली उमेदवारी आम्हाला मंजूर नसल्याचे ते म्हणाले. मागील पाच वर्षात ओमराजे निंबाळकर आमदार असताना तसेच त्यांच्या ताब्यात झेडपी असताना त्यांनी कुठल्या शिवसैनिकांना न्याय दिला? असा खडा सवालही त्यांनी केला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख शानबाग मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी ‘माझ्या मनातही शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पाटील हेच असल्याचे सांगताच नगरसेविका प्रेमाताई पाटील यांनी त्यांच्या या वक्त व्यावर आक्षेप घेतला. ‘शानबाग साहेब, अण्णाचे नाव घेऊ नका. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नव्हती’, असे त्या म्हणाल्या. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके शेवटच्या टप्प्यात बैठकस्थळी हजर झाले. बैठकस्थळी आल्यावरही ते मंचाकडे न जाता कार्यकर्त्यांसाठीच्या खुर्चिवर जावून बसले. त्यावर मंचावर उपस्थित शानबाग, ओम राजेनिंबाळकर यांनी मंचावर येण्यास सांगितल्यानंतर ते मंचावर गेले. दरम्यान, खा. रवींद्र गायकवाड यांनी बोलाविलेल्या या बैठकीमध्ये गटबाजीचे प्रदर्शन झाले. पालिका निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलावलेल्या बैठकीस खुद्द जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांच्यासह सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचीही गैरहजेरी होती. एकूणच जुने आणि नवे शिवसैनिक यांच्यात दरी निर्माण झाल्याचे या बैठकीतून समोर आले. ही दरी शिवसेनेचे उपनेते प्रा. तानाजी सावंत कशा प्रकारे दूर करतात? हे पाहणे आता आत्सुक्याचे ठरणार आहे.