बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी जिल्ह्यातील सहा पालिकांमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. निवडी पालिकेच्या होत्या; पण त्यावर विधानसभा निवडणुकीच्या समीकरणांचा प्रभाव दिसून आला. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगावात निवडी बिनविरोध झाल्या. परळी, धारुर येथे मात्र मतदान झाले. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.माजलगावात जावळे, मेंडकेमाजलगाव येथील पालिकेवर युतीचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष पद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होते. शिवसेनेच्या पंचशीला जावळे एकमेव सदस्या त्यासाठी पात्र होत्या. त्यामुळे त्यांची निवड अपेक्षितच होती. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून सहाल चाऊस, भाजपाकडून दीपक मेंढके तर अपक्ष इनायत पठाण यांनी उमेदवारी दाखल केली. बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी चाऊस, पठाण यांची मने वळविली. त्यामुळे मेंढके यांची उपनगराध्यक्ष म्हणून अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे, तहसीलदार अरूण जऱ्हाट, मुख्याधिकारी अब्दुल सत्तार उपस्थित होते. बाबूराव पोटभरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, तालुकाध्यक्ष अरुण राऊत, सतीश सोळंके, ज्ञानेश्वर मेंडके उपस्थित होते.गेवराईत निवडीनंतर मिरवणूकयेथील पालिका भाजपाच्या ताब्यात आहे. नगराध्यक्ष पदासाठी महेश दाभाडे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांच्या निवडीवर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. उपाध्यक्षपदी मधुकर वादे यांची बिनविरोध निवड पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण बोडखे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी काम पाहिले. निवडीनंतर अॅड. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.धारुरात बंडखोरीधारुर पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचे १० तर भाजपाचे ७ सदस्य आहेत. बंडखोरीमुळे येथील निवड लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा गोदावरी लक्ष्मण सिरसट यांनी बंडखोरी करत पक्षातील अन्य दोन सदस्य व भाजपाच्या सात सदस्यांच्या मदतीने नगराध्यक्षपद काबिज केले. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच सविता शिनगारे यांची निवड झाली. नगराध्यक्षपदासाठी पक्षाने विद्यमान उपाध्यक्ष माधव अंबादास निर्मळ यांच्या नावापुढे मोहोर उमटविली. मात्र, राष्ट्रवादीच्या गोदावरी सिरसट यांनीही अर्ज दाखल केला. त्यानंतर पक्षाने व्हिप लागू केला; पण सिरसट यांच्यासह सविता शिनगारे, बालाजी चव्हाण यांनी व्हिप डावलला. राष्ट्रवादीच्या शारदा गायकवाड गैरहजर राहिल्या. सिरसट यांना १० मते मिळाली तर निर्मळ यांना ६ मतांवरच समाधान मानावे लागले. बंडखोरी करत गोदावरी सिरसट नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. तर उपनगराध्यक्षपदी सविता शिनगारे यांची अविरोध निवड पार पडली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आंनदोत्सव साजरा केला.परळीत धर्माधिकारी नगराध्यक्षकेंद्रीय ग्रामीण विकासमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच पार पडणाऱ्या परळी पालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. या निवडींकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले होेते. आ. धनंजय मुंडे यांची हुकूमत आहे. काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी करत त्यांनी पालिकेत आघाडीचा झेंडा फडकावला होता. यावेळीही त्यांनी काँग्रेसला विश्वासात घेतले. नगराध्यक्षपदी आ. धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक बाजीराव धर्माधिकारी यांची वर्णी लागली. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा ढवळे यांची अविरोध निवड झाली. सदस्यांच्या विशेष सभेला २३ जणांची उपस्थिती होती़ भाजपाच्या सात सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली़ नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कुसूम चाटे यांनी अर्ज दाखल केला. परंतु त्यांनी अर्ज आधीच मागे घेतला होता़ नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून बाजीराव धर्माधिकारी तर काँग्रेसकडून प्रा़ विजय मुंडे यांनी उमेदवारी दाखल केली़ हात उंचावून मतदान झाले़ धर्माधिकारी यांना २३ मते मिळाली तर काँग्रेसच्या प्रा़ विजय मुंडे यांना स्वत:च्या मतावर समाधान मानावे लागले़ उपनगराध्यक्षपदासाठी निलाबाई रोडे यांचाही अर्ज होता; पण त्या सभागृहातून निघून गेल्या. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी मीरा ढवळे यांची बिनविरोध निवड झाली. त्या प्रा. टी.पी. मुंडे गटाच्या समर्थक आहेत.अंबाजोगाईत पुन्हा मोदीअंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा रचना सुरेश मोदी यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी एम. ए. हकीम यांना संधी मिळाली. नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदावर रचना मोदी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर उपनगराध्यक्षपदासाठी एम. ए. हकीम यांचाही एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडी झाल्या. पालिकेत अंबाजोगाई विकास आघाडीचे २८ पैकी २० सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात तर भाजपच्या एकमेव नगरसेविका आहेत. बीडमध्ये दुधाळ, इनामदारांना संधीयेथील पालिकेत राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व आहे. नगराध्यक्षपदासाठी रत्नमाला बाबूराव दुधाळ यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांची निवड आधीच निश्चित होती. शनिवारी केवळ अधिकृत घोषणा झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी नसीम इनामदार यांचा एकमेव अर्ज आला. दुधाळ, इनामदार यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. निवडीनंतर गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचितांचा सत्कार झाला. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़चार ठिकाणी महिलांना संधीपालिकाअध्यक्षउपाध्यक्षगेवराईमहेश दाभाडे (भाजप)मधुकर वादेबीडरत्नमाला दुधाळ (राष्ट्रवादी)नसीम इनामदारपरळीबाजीराव धर्माधिकारी (राष्ट्रवादी)मीरा ढवळेधारुरगोदावरी सिरसट (राष्ट्रवादी)सविता शिनगारेअंबाजोगाईरचना मोदी (विकास आघाडी)एम. ए. हकीममाजलगावपंचशीला जावळे (शिवसेना)दीपक मेंडके
निवडी नगराध्यक्षांच्या, लक्ष्य विधानसभेचे
By admin | Updated: July 20, 2014 00:34 IST