लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या स्वीकृत समिती सदस्य आणि स्थायी समितीच्या सदस्यांची १५ जून रोजी निवड केली जाणार आहे़ महापालिकेची निवडणूक होवून महापौर व उपमहापौरांची निवड झाली़ परंतु, स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया रखडली होती़ त्यामुळे अनेक इच्छुकांचे लक्ष या निवडीकडे लागले होते़ दरम्यान १५ जून रोजी सकाळी ११ वाजता येथील बी़ रघुनाथ सभागृहात महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होणार असून, या सभेत निवडी केल्या जाणार आहेत़ प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याने सभेमध्ये आपल्या स्वीकृत सदस्यांची यादी द्यावयाची आहे़ त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत़ दरम्यान, या सर्वसाधारण सभेत एकूण ३६ विषयांवर चर्चा होणार आहे़ त्यात महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अकृतीबंध आराखड्यास मान्यता घेणे, घंटागाडी खरेदी करणे, दलित वस्ती सुधारणा, घरपट्टी, नळपट्टीची शाश्ती अशा प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे़
१५ जून रोजी स्वीकृत सदस्यांची निवड
By admin | Updated: June 8, 2017 00:14 IST