शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवास घरकुलाचे ४३४४ लाभार्थी निवडले

By admin | Updated: August 7, 2014 23:37 IST

जालना : इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षासाठी ४३४४ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे.

जालना : इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षासाठी ४३९९ घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ४३४४ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे. थेट लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ही योजना राबविली जाते. अनुसुचित जातीच्या सुधारित प्रतीक्षा यादीतील ३०८३ तर सर्वसाधारण प्रवर्गातील १२६१ लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.गेल्यावर्षीपासून इंदिरा आवास योजनेतंर्गत घरकुलाची किंमत एक लक्ष करण्यात आली असून यामध्ये केंद्र शासनाकडून ५२ हजार ५०० रूपये व राज्य शासनाकडून ४२ हजार ५०० अशी अनुदानाची रक्कम आहे. त्यात अनुदानापोटी ९५ हजार व लाभार्थी हिस्सा ५ हजार रूपये इतका आहे. या वर्षी लाभार्थ्यांना थेट पत्राद्वारे घरकुल मंजुरीचे आदेश पाठविण्यात येणार आहे. मंजूर लाभार्थ्यांसाठी रहिवाशी प्रमाण, नमुना क्र.८, दारिद्रय रेषे खाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, कुटूंब पत्रक, करारनामा, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रती, यापूर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्या बाबतचा दाखला, इत्यादी कागदपत्रासहीत प्रस्ताव सादर करावे.