शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

निवडा आवडीचे क्षेत्र..अन् घ्या गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 01:09 IST

औरंगाबाद : तयार झालेले वृत्तपत्र घराघरांत नेऊन देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात, ते आपले वृत्तपत्र विक्रे ते बंधू. वृत्तपत्र समूहाचा जणू ते मोठा आधार असतात.

औरंगाबाद : तयार झालेले वृत्तपत्र घराघरांत नेऊन देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात, ते आपले वृत्तपत्र विक्रे ते बंधू. वृत्तपत्र समूहाचा जणू ते मोठा आधार असतात. या वृत्तपत्र विक्रे त्या सहकाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा लोकमत भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा त्यांच्या पालकांसहित मान्यवर अतिथींच्या हस्ते यानिमित्ताने गौरव करण्यात आला. याप्रसंगी डीसीपी राहुल श्रीरामे, मिस इंडिया युनिव्हर्सची रनर अप नवेली देशमुख, ‘सैराट’ चित्रपटात परशाच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते संभाजी तांगडे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, सारा बिल्डर्सचे चेअरमन सीताराम अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर तसेच लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, वितरण विभागाचे उपाध्यक्ष वसंत आवारी, औरंगाबाद जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, सचिव नीलेश फाटके, संघटनेचे पदाधिकारी गणेश भोसले, मोहम्मद फहिम आदींच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभ्यासापेक्षाही आयुष्यात इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या आवडीनुसार आपले करिअर निवडा, सामान्य विद्यार्थीही आयुष्यात खूप काही मिळवू शकतो, असा विश्वास डीसीपी श्रीरामे यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. आजच्या तरुणाईचा आयकॉन ठरलेल्या नवेली देशमुखने दहावी व बारावी हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक त्यांचे मनपसंत करिअर निवडावे, असा सल्ला दिला. जीवनात यशस्वी होण्यासाठी पैसा किंवा परिस्थिती अनुकूल पाहिजे असे काही नसते, त्यामुळे परिस्थितीचा अजिबात दबाव घेऊ नका, असा मार्मिक उपदेश उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना के ला. सीताराम अग्रवाल म्हणाले की, आयुष्यात संकटे येतात, त्यामुळे संकटे आल्यावर त्यापुढे हतबल न होता, त्यातून यशस्वीपणे मार्ग काढणे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे, याप्रसंगी वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव, तसेच वितरण विभागातील सर्व सहकाऱ्यांची उपस्थिती होती. आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात नुकतीच घडली. या घटनेत जिगीषा फड या चिमुरडीचे प्राण वाचले ते वृत्तपत्र विक्रेते बंधू परसराम गायके यांच्यामुळे. या कार्यक्रमात डीसीपी राहुल श्रीरामे यांच्या हस्ते गायके यांचाही सत्कार करण्यात आला. आपल्या सहज, सोप्या भाषेत बोलायला सुरुवात करून अभिनेते संभाजी तांगडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. कोण किती यशस्वी आहे, हे ठरविण्यासाठी ‘टक्के’ हा काही मापदंड नव्हे, नापास होणाराही आयुष्यात खूप मोठा होऊ शकतो, असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.ग्रामीण भागातील असूनही आपल्या वडिलांनी आपण निवडलेल्या करिअरला पाठबळ दिले, त्यांच्या विश्वासामुळेच आज आपण इथपर्यंत येऊ शकलो, असे ते म्हणाले. आपल्या इच्छा मुलांवर न लादता त्यांच्या सुप्त गुणांना बाहेर काढून, मुलांना मुक्तपणे उडू द्या, अशी विनंती त्यांनी पालकांना केली. उपस्थितांच्या आग्रहास्तव ‘सैराट’ चित्रपटातील संवादही त्यांनी म्हटले.