शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सीमोल्लंघनाने दसरा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:46 IST

विजयादशमीनिमित्त शहरातील नागरिकांनी विविध भागांमध्ये सीमोल्लंघन करुन दसºयाचा सण उत्साहात साजरा केला. एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विजयादशमीनिमित्त शहरातील नागरिकांनी विविध भागांमध्ये सीमोल्लंघन करुन दसºयाचा सण उत्साहात साजरा केला. एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून जिल्हाभरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी होम-हवन, देवीची महापूजा करण्यात आली.दशमीच्या दिवशी या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. विजयादशमी हा सण विजयाचे प्रतिक मानला जातो. शनिवारी जिल्हाभरात दसºयाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सकाळपासूनच सणाची लगबग सुरु झाली होती. व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये स्वच्छता करण्यात आली. हार, फुलांच्या तोरणांनी व्यापारी प्रतिष्ठाने, घरांचे प्रवेशद्वार सजविण्यात आले. सायंकाळी ठिकठिकाणी लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.सायंकाळी ६ वाजेनंतर प्रत्यक्ष सीमोल्लंघन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात परंपरेनुसार सिमोल्लंघन कार्यक्रम घेतला जातो. शहरातील विविध भागातून नागरिक या ठिकाणी दाखल झाले. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोमनाथ मानकर, पोलीस निरीक्षक संजय हिबारे आदींनी आलेल्या नागरिकांचे स्वागत केले. यावेळी मानाच्या दिंडीचेही स्वागत करण्यात आले. दिंडीत पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा पोलीस दलातील शस्त्रांचे पूजन केल्यानंतर प्रदर्शन भरविण्यात आले होते. याच भागात असलेल्या पेडा हनुमान मंदिरातही सीमोल्लंघनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी जिल्हा स्टेडियममध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. नवीन वसाहतींमध्ये ठिकठिकाणी सीमोल्लंघन करण्यात आले. शमी वृक्षाचे पूजन करुन आपट्यांची पाने देऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.