शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता नातवाला पाहून आजीच्या डोळ्यात अश्रू!

By admin | Updated: March 11, 2017 00:09 IST

बीड : देवदेवतांची छायाचित्रे विकून मजल- दरमजल करत भटकणाऱ्या आजी व नातवाची गुरुवारी गेवराईत ताटातूट झाली.

बीड : देवदेवतांची छायाचित्रे विकून मजल- दरमजल करत भटकणाऱ्या आजी व नातवाची गुरुवारी गेवराईत ताटातूट झाली. आजीने अन्न- पाणी सोडले. पोलीस ठाणे गाठून नातू हरवल्याची तक्रार दिली. इकडे तळेगाव (ता. बीड) येथे वणवण भटकणारा एक बालक आढळला. त्याला नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर हा मुलगा गेवराईतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. अखेर नातवाला आजीच्या स्वाधीन केले. तेव्हा आजीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. शिवकुमार तेली असे त्या नातवाचे तर चिनम्मा तेली असे आजीचे नाव. ते दोघे कर्नाटकातील कलीबर्गी जिल्ह्यातील जारंगी तालुक्यातील कट्टीसंगमचे रहिवासी. शिवकुमारचे आई- वडील ऊसतोडीचे काम करतात तर आजी- नातू छायाचित्रे विकून उदरनिर्वाह भागवतात. मजल - दरमजल करत ते बीड जिल्ह्यात आले. गेवराईत गुरुवारी ते पाल ठोकून मुक्कामी होते. मात्र, सायंकाळी शिवकुमार गायब झाला. आजीने सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. शेवटी तिने गेवराई ठाणे गाठून नातू हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी हा मेसेज वायरलेसवरुन सर्व ठाण्यांना कळविला. रिक्षातून शिवकुमार बीडला आला. त्याला कुठे जावे कळत नव्हते. भटकत तो तळेगावात पोहोचला. शुक्रवारी तळेगाव परिसरात एक ९ वर्षीय बालक वणवण फिरत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याला मराठी, हिंदीही येत नव्हती. त्याची भाषा समजणे कठीण बनल्याने गावकऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना कळविले. पोकॉ यू. टी. जरे, बबन सानप यांनी त्यास ताब्यात घेऊन बीडला आणले. यावेळी चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्त्वशिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडेही उपस्थित होते. गेवराईतून एक मुलगा गायब असल्याचे कळाल्यावर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क केला. वर्णनावरुन तो शिवकुमारच असावा असा अंदाज पोलिसांना होता. गेवराईचे पोलीस आजीला घेऊन बीडला आले. ग्रामीण ठाण्यात आजी- नातवाची २४ तासानंतर भेट झाली.