शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र विकून बियाणांची खरेदी

By admin | Updated: June 9, 2017 00:58 IST

आष्टी : यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. तालुक्यातील बीडसांगवी येथील महिलेने तर चक्क मंगळसूत्र मोडून बी-बियाणे खरेदी केले आहे.लक्ष्मीबाई घुंबरे असे त्या महिलेचे नाव आहे. घुंबरे या आष्टी येथील सोनाराच्या दुकानात दोन पळ्या असलेले मंगळसूत्र व ११ वर्षाचा असलेला नातवाच्या कानातील बाळी घेऊन आल्या. हे सोने मोडून त्याचे चार हजार ९५० रुपये त्यांनी घेतले. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिथे उपस्थित असलेल्या शिक्षक अमोल कदम यांनी अडचण विचारली. यावर त्यांनी त्यांच्या परिस्थितीचा लेखाजोखाच मांडला. लक्ष्मीबाई घुंबरे म्हणाल्या, मला पावणेदोन एकर जमीन आहे. यावर्षी पावसाने चांगली सुरूवात केल्याने यंदाची पेरणी वेळेवर होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत. डोक्यावर अगोदरच बँकेचे कर्ज आहे. मग पुन्हा बँक दरवाजात उभा करणार नाही म्हणून तिकडे फिरकलेच नाही. सावकार दरवाजा उभा राहू देत नाही. कोणी हातउसने पैसे देत नाही. म्हणून मी मंगळसूत्र व नातवाच्या कानातली बाळी मोडून बी-बियाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मी आज हे सोने विकले. यातून मला ४ हजार ९५० रुपये मिळाले आहेत, असे त्या म्हणाल्या.