शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीचा दुसरा टप्पा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:46 IST

बीड शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून राज्यस्तरीय समितीच्या तपासणीत बीड पालिका यशस्वी झाली आहे. पहिले दोन टप्पे पार करणाºया पालिकेने आता केंद्रीय समितीच्या तपासणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून राज्यस्तरीय समितीच्या तपासणीत बीड पालिका यशस्वी झाली आहे. पहिले दोन टप्पे पार करणाºया पालिकेने आता केंद्रीय समितीच्या तपासणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे.स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत शौचालय बांधा, वापरा तसेच सार्वजनिक शौचालयांचा उपयोग करा, अशा आशयाचे आवाहन केले जात आहे. तसेच त्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदानही दिले जात आहे. काहींना पहिला टप्पा वितरीतही करण्यात आला आहे. त्यामुळे बीड शहर हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे.गत आठवड्यात उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या जिल्हास्तरीय समितीने शहराची पाहणी करून पालिकेला पास केले होते. त्यानंतर रविवारी रात्री व सोमवारी सकाळी लातूर महापालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या राज्यस्तरीय समितीने शहराची तपासणी केली. सोमवारी रात्री इंदिरा नगरसह परिसरातील ओ.डी.स्पॉटची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर सोमवारी सकाळीही शहरातील सर्व ओ.डी.स्पॉट, शाळा, महाविद्यालये, बचत गट, विद्यार्थी यांच्या भेटी घेऊन संवाद साधण्यात आला. त्यानंतर दुपारी एक वाजता बीड पालिकेत याबाबत निकाल घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये बीड पास झाल्याचे नमूद केल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या समितीने पाथरीचे मुख्याधिकारी देविदास जाधव, झरी येथील माधव पाटील झरीकर, रविंद्र केसरकर यांचा समावेश होता.