शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

महाराष्ट्राचा सलग दुसरा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:33 IST

साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अ‍ॅस्ट्रो टर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघाने महाराष्ट्रावर २-१ असा विजय मिळविला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव ठरला. दरम्यान हरियाणा संघाने विजयी घोडदौड कायम ठेवताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

ठळक मुद्देज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : हरियाणा संघाची विजयी घोडदौड

औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अ‍ॅस्ट्रो टर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघाने महाराष्ट्रावर २-१ असा विजय मिळविला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव ठरला. दरम्यान हरियाणा संघाने विजयी घोडदौड कायम ठेवताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.‘क’ गटातील सामन्यात व्यंकटेश केचे याने २८ व्या मिनिटाला गोल करताना महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली; परंतु ओडिशा संघाने उत्तरार्धात जबरदस्त मुसंडी मारली. अमरदीप लाकरा याने ३६ व्या मिनिटाला गोल करून ओडिशाला बरोबरी साधून दिली तर ५१ व्या मिनिटाला गे्रगोरी झेस याने गोल करून ओडिशाचा विजय निश्चित केला.हरियाणा संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना सोमवारी झारखंड संघावर ३-२ अशी मात करून ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळविले. हरियाणाकडून चौथ्या आणि ३६ व्या मिनिटाला असे दोन गोल करून अंकुशने विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्याकडून तिसरा गोल परमितने ५२ व्या मिनिटाला केला. झारखंडकडून अनुरुद भेंगरा आणि राजू होरो यांनी गोल केले.‘ब’ गटातील लढतीत पहिल्या दिवशी पराभवाची चव चाखणाºया मणिपूरने दुसºया दिवशी मुंबई संघावर ४-३ अशी मात केली. त्यांच्याकडून नीरजकुमार वारीबामने याने १९ व्या व ४७ व्या मिनिटाला तर रोहित इरेंगबाम याने २८ व्या व ३२ व्या मिनिटाला गोल करून मणिपूर संघाकडून निर्णायक भूमिका बजावली. मुंबईकडून अनिल राठोडने ३८ व्या आणि मोहित कथोटे याने ४३ व्या मिनिटाला प्रत्येकी १ गोल केला. तामिळनाडूकडून पराभवाला सामोरे जाणाºया गत विजेत्या पंजाबने सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड संघावर ५-१ अशी मात केली. पंजाबकडून सिमरन ज्योत याने ३ ºया व ७ व्या मिनिटाला, विशालजितसिंगने ४९ व्या, रमण कुमारने ५३ व्या व अंगदबीरसिंगने ६० व्या मिनिटाला गोल केले. पराभूत संघाकडून दीपकने १२ व्या मिनिटाला गोल केला. तामिळनाडू व हिमाचल प्रदेश यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटली. तामिळनाडूकडून एस. कार्थीने ४४ व्या व एस. मरीश्वरनने ४८ व्या मिनिटाला गोल केला. हिमाचल प्रदेशकडून चरणजितसिंग आणि अमित यांनी अनुक्रमे ५७ व्या व ५९ व्या मिनिटाला गोल करून तामिळनाडूला विजयापासून वंचित ठेवले.