शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध उद्योग करणाऱ्यांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:13 IST

औरंगाबाद : गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’ करणाºयांचा अखेर अन्न व औषध प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. औषध प्रशासनाबरोबर आरोग्य ...

ठळक मुद्दे औषध प्रशासन झाले जागे : आरोग्य विभागाकडूनही सुरू पडताळणी

औरंगाबाद : गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’ करणाºयांचा अखेर अन्न व औषध प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. औषध प्रशासनाबरोबर आरोग्य विभागाने जिल्ह्यात पडताळणी सुरू केली आहे.जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध विक्रीचा ‘उद्योग’ सुरू आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात होण्याचे प्रकार होत आहेत. हा प्रकार ‘लोकमत’ने २९ जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्ताच्या दुसºयाच दिवशी गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरांच्या टोळीकडेही गर्भपाताच्या गोळ्या सापडल्या आहेत.चारशे ते पाचशे रुपये किंमत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या अक्षरश: दीड ते दोन हजारांपर्यंत सर्रास विकल्या जात आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या उपलब्ध करून देणारे सक्रिय आहेत; परंतु त्यांच्यापर्यंत आरोग्य विभाग पोहोचत नसल्याने हा ‘धंदा’ जोरात सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास अवैध विक्री होत असताना औषध प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याची ओरड जनसामान्यांतून होत होती. या प्रकारावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री करणाºयांवर नियमितपणे कारवाई केली जाते. यापुढेही बेकायदेशीररीत्या विक्री करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले.आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले की, गर्भपाताच्या गोळ्यांसंदर्भात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत.कारवाई करणारगर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या देणाºयांवर कारवाई केली जाते. यापूर्वी अशा कारवाया केलेल्या आहेत. आताही अवैधरीत्या गोळ्यांची विक्री करणाºयांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. कोणीही अवैध विक्री करीत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनीही माहिती द्यावी.-संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)

टॅग्स :medicineऔषधंAbortionगर्भपात