लातूर जिल्ह्यातील पहिला सायकल चोरीचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर, यातील दोन सायकली शिवाजीनगर पोलिसांकडे जमा करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी महाविद्यालयीन दोन विद्यार्थ्यांनी आपली सायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली केल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याला ३३ सायकलींच्या मालकांचा शोध पोलिसांकडून अद्यापही सुरुच आहे. गेल्या महिनाभरापासून, सायकलींच्या मालकांचा शोध न लागल्यामुळे त्या ३३ सायकली जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पडून आहेत. सायकल चोरी प्रकरणात फिर्यादींनी आपल्या सायकली घेवून जाण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले होते. मात्र गेल्या महिनाभरात दोन महाविद्यालयीन तरुणांशिवाय कोणीच पुढे आले नाही. आता या सायकलींचे वाटप कसे करायचे, याच पेचात पोलिस प्रशासन आहे. त्यासाठी ज्यांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत, अशा सायकल मालकांनी सायकलीबाबतचा पुरावा आणि शपथपत्र देवून सायकल घेवून जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.(प्रतिनिधी)
‘त्या’ सायकलींच्या मालकांचा शोध सुरुच
By admin | Updated: July 16, 2016 01:13 IST