१५ व्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी भरीव अनुदान मिळत असल्याने आणि ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी मिळालेले अधिकार यामुळे सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे. तर काहीजण एकमेकांची जिरवण्यासाठी रणनीती तयार करीत आहेत. या टप्प्यात तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्याबरोबर गावपातळीवरील राजकारणाने कलाटणी घेतली असून पुढाऱ्यांसह इच्छुकांनी बैठका, घरोघरी भेट देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे.
पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती-
नागदतांडा, निपाणी, औराळा, तेलवाडी, लामणगाव, हतनूर, जैतखेडातांडा, बनशेंद्रा, देवपुडी, डोंगरगाव, घाटशेंद्रा, सावरगाव, तळणेर, चिंचखेडा बु., चिंचोली लिं., देवळाणा, धामणी खु., गणेशपूर, जवळी खु., करंजखेडा, लंगडातांडा, नेवपूर जा., नेवपूर खा., रुईखेडा, टापरगाव, टाकळी अंतूर, वडाळी, वडोद, रेल, सातकुंड, सायगव्हाण, आंबा, अंधानेर, चापानेर, चिकलठाण, जैतापुर, जैतखेडा, जेहुर, कळंकी, खेडा, माटेगाव, नादरपूर, नागद, नागापूर, नावडी, निंभोरा, पिंपरखेडा, वडोद, वाकद, बरकतपूर, बिबखेेेडा, बोरसर बु., देवगाव रंगारी, मुंडवाडी, निमडोंगरी, तपोवन, चिमणापूर, बेलखेडा, पळशी बु.,आलापूर, देेेभेगाव, घुसुर, हसनखेडा, मुंडवाडी तांडा, रोहीला खु., रामपुरवाडी, सोनवाडी, सासेगाव, उपळा, वाकी, चांभारवाडी, कोळवाडी, कानडगाव क., पिशोर, उंबरखेडा, आंबातांडा, अंबाला, बोरसर खु., भांबरवाडी, मक्रणपूर, ताडपिंपळगाव, उंबरखेडा तांडा, आठेगाव व सीतानाईक तांडा.