शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादहून ‘इंडिगो’च्या ‘टेकऑफ ’वर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:24 IST

विमानतळावर प्राधिकरणाने कार्यालयासाठी दिली जागा

ठळक मुद्देऑक्टोबरपासून विमानसेवेची हालचाल

औरंगाबाद : एअर इंडिया, ट्रूजेट आणि स्पाईस जेटपाठोपाठ  आता ‘इंडिगो’कडूनही औरंगाबादहून नवीन विमान सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे क ाम सुरू आहे. त्यामुळे शहरातून ‘इंडिगो’च्या ‘टेकआॅफ ’ होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ट्रूजेट कंपनीच्या कार्यालयाच्या शेजारी ‘इंडिगो’चे कार्यालय उभे राहत आहे. याठिकाणी केबिन, फर्निचरचे काम सुरू आहे. औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी ११ जून रोजी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाची स्पाईस जेट आणि इंडिगोच्या व्यवस्थापकीय समितीसोबत बैठक झाली होती. 

यावेळी दोन्ही विमान कंपन्यांनी औरंगाबादमधून नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर स्पाईस जेटने औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा जाहीर केली. परंतु ‘इंडिगो’च्या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे. या कंपनीच्या कार्यालयाचे कामकाज सुरू झाल्याने ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने १९ जुलै रोजी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा विमानतळावर सोयी-सुविधांचीही पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सोयी-सुविधांविषयी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विमानतळावर आवश्यक कस्टमर सर्व्हिस, सुरक्षा, रॅम्प पोझिशन यासह ग्राऊंड स्टाफ आदी कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रियाही पार पडली. या कर्मचाऱ्यांचे सध्या दिल्ली, बंगळुरू येथे प्रशिक्षण सुरूअसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्लॉट मिळताच सेवा‘इंडिगो’ला सध्या स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळण्याची प्रतीक्षा आहे. १० आॅक्टोबरपासून विमानसेवा सुरू होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईसह इतर मार्गावरही विमानसेवा सुरू केली जाऊ शकते. 

विमानतळाचे अधिकारी म्हणतात...‘इंडिगो’ला कार्यालयासाठी जागा दिली आहे. कार्यालय निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र, विमानसेवेच्या वेळापत्रकासंदर्भात अद्याप काही माहिती मिळालेली नाही, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.

टॅग्स :IndigoइंडिगोAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन