मालेगाव : गत सात दिवसांपासून मालेगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून एक शेळी व दोन वगारी यांना मारले असून यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे़मालेगाव परिसरातील कामठा, कोंढा, कासारखेडा शिवारात बिबट्या आला असून गेल्या सात दिवसांपासून कामठा येथील शेतकरी विजय आवर्दे व मारोती करंगिरे यांच्या शेतातील वगारू मारून फस्त केले़ कासारखेडा येथील दलजितसिंग लांगरी यांची शेळी खाल्ली़ बिबट्याच्या या धुमाकुळीमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़वनविभागाने बिबट्याला लवकर ताब्यात घ्यावे, अशी या परिसरातील शेतकरीवर्गातून मागणी होत आहे़ घटनास्थळी रेंजर पाटील, वनपाल व्ही़ जी़ नाईक यांनी भेट दिली़ (वार्ताहर)वनविभागाकडून कामठा शिवारात बिबट्याने खाल्लेल्या प्राण्याची तपासणी केली असून या परिसरात बिबट्याच्या पंजाचे ठसे मिळून येत आहेत़ वनविभागाकडून बिबट्याला लवकर पकडले जाईल - व्ही़जी़नाईक, वनपाल, अर्धापूऱ
मालेगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Updated: September 7, 2014 00:28 IST